आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील सहाव्या सामन्यात ए ग्रुपमधील बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने आहेत. बांगलादेशने या स्पर्धेत विजयी सुरुवात करणाऱ्या न्यूझीलंडला विजयासाठी 237 धावांचं आव्हान दिलं आहे. बांगलादेशने 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 236 धावा केल्या. टीम इंडियाने 20 फेब्रुवारीला बांगलादेशचा पराभव करत विजयी सलामी दिली होती. त्यामुळे बांगलादेशसाठी हा सामना करो या मरो असा आहे. तसेच या सामन्याच्या निकालाकडे सलग 2 सामने गमावणाऱ्या पाकिस्तानचंही लक्ष आहे. बांगलादेश हा सामना जिंकला तर पाकिस्तानच्या उपांत्य फेरीतील जर तरच्या आशा कायम राहतील. त्यामुळे आता हा सामना कोण जिंकणार? याकडे साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
बांगलादेश प्लेइंग इलेव्हन: नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तन्झिद हसन, मेहदी हसन मिराज, तॉहिद हृदॉय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्लाह, जाकर अली, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, नाहिद राणा आणि मुस्तफिजुर रहमान.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन: मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, डेव्हॉन कॉनव्हे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, टॉम लाथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, काइल जेमिसन आणि विल्यम ओरोर्क.