संत निरंकारी मंडळातर्फे सिंधुदुर्गात स्वच्छता मोहीम
esakal February 25, 2025 12:45 AM

47390

संत निरंकारी मंडळातर्फे
सिंधुदुर्गात स्वच्छता मोहीम

कणकवली, ता. २४ ः संत निरंकारी मंडळ सिंधुदुर्गच्यावतीने आज ‘स्वच्छ जल - स्वच्छ’ मन अंतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात निरंकारी मंडळाच्या सदस्यांनी आरवली वेतोबा मंदिर तळी, वेंगुर्लेतील ब्रह्मेश्वर तळी, कणकवली शहर आणि कुडाळ बांबुळी येथील गणपतीसाणा, देवगड बीच आणि नाधवडे येथील परिसर स्वच्छ करण्यात आला.
जिल्ह्यातील पाच ठिकाणच्या जलस्त्रोतांची स्वच्छता अभियानाच्या या उपक्रमामध्ये ६५० निरंकारी सदस्यांनी सहभाग घेतला. दरम्यान आज एकाच दिवशी संपूर्ण देशभरात १६५० पेक्षा अधिक ठिकाणच्या जलस्त्रोतांच्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात १० लाखाहून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतल्याची माहिती संत निरंकारी मंडळ सिंधुदुर्गच्यावतीने अजिंक्य मुसळे यांनी दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.