औरंगजेब आणि अकबर हे दोघेही मुघल साम्राज्याचे बादशाह होते. मुघलांच्या इतिहासात या दोघांबद्दल सर्वाधिक लिखाण आहे.
अकबर आणि औरंगजेबाबद्दल पाकिस्तानात वेगवेगळे विचार आहेत. अकबराबद्दल नकारात्मक भावना असून दुसरीकडे औरंगजेबावर कौतुकाचा वर्षाव करतात.
अकबराच्या धार्मिक विचारांमुळे त्याच्याबाबत पाकिस्तानच्या शालेय अभ्यासक्रमातही नकारात्मक लेख आहे. यावर पाकिस्तानी इतिहासकार मुबारक अली यांनी लिहिलंय.
मुबारक अली यांनी लिहिलं की, अकबराने हिंदू-मुस्लिम एक करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्यावर टीका झाली. त्याने मुस्लिमांना धोक्यात टाकलं.
औरंगजेबाचं मात्र पाकिस्तानी कौतुक करतात. औरंगजाबाने मुस्लिमांची आस्था म्हणून दारू पिणं, जुगार खेळणं आणि वेश्याव्यवसाय यावर बंदी घालण्याचे आदेश दिले होते.
पाकिस्तानी इतिहासकारांनी लिहिलंय की, औरंगजेबाने अनेक कर संपुष्टात आणले जे इस्लामी कायद्यानुसार योग्य नव्हते. महसूलाची भरपाई करण्यासाठी बिगर मुस्लिमांवर जजिया कर लागू केला होता.
औरंगजेब कट्टर इस्लाम मानणारा होता. मुस्लिमांना पुढे नेण्यासाठी त्याने पावले उचलली असं पाकिस्तानींना वाटतं.
औरंगजेब का बनला होता शाकाहारी?