वहागाव - येथील झोपडपट्टीत कष्टकरी, मजूर राहात आहेत. त्यांनी आज महामार्गालगत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यालय सुरू केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा हा पक्ष असून, सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्रित करणारा हा पक्ष आहे.
त्यामुळे बहुजन समाजाच्या विकासासाठी हा पक्ष सदैव कटिबद्ध आहे. झोपडपट्टीवासीयांच्या असणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही आरपीआय नेते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली.
येथे आरपीआयच्या (आठवले गट) जनसंपर्क शाखा कार्यालयाचे उद्घाटन मंत्री श्री. आठवले यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. यावेळी मातंग आघाडी अध्यक्ष आनंदा वायदंडे, जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, उत्तर तालुकाध्यक्ष उत्तम कांबळे, दक्षिण तालुकाध्यक्ष अप्पासाहेब गायकवाड, शाखा अध्यक्ष रवी पायाळ, उपाध्यक्ष रमेश गायकवाड, सचिव सूरज मुल्ला, सदस्य ऋषिकेश जाधव, हणमंत कदम, मारुती पवार, महादेव अलकुंटे, कमलेश मकानदार, लालासाहेब सकट, विकास जाधव आदींची उपस्थिती होती.
दरम्यान, यावेळी विविध मान्यवरांची भाषणे झाली. पायाळ यांनी प्रास्ताविक केले. सूरज मुल्ला यांनी आभार मानले.