आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि चुकिच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे तुम्हाला आरोग्यासंबंधित अनेक समस्या होऊ शकतात. कामाच्या धावपळीमुळे अनेकजण घरच्या जेवणापेक्षा बाहेरच्या फास्ट फूडचे जास्त प्रमाणात सेवन करतात. परंतु, फास्ट फूडच्या अतिसेवनामुळे तुमच्या शरीराला योग्य पोषण मिळत नाही. फास्ट फूडच्या सेवनामुळे तुमच्या शरीरातील फॅटी लिव्हरची समस्या खूप वेगाने वाढताना दिसतेय. अस्वस्थ जीवनशैलीमुळे आणि तुमच्या शरीराची हालचाल योग्य नाही केल्यामुळे तुम्हाला फॅटी लिव्हरच्या समस्या उद्भवतात. जर तुम्हाला फॅटी अॅसिड्सच्या समस्यांपासून दूर राहायचे असेल तर तुमच्या दैनंदिन आहारामध्ये काही विशेष गोष्टींची काळजी घेतली पाहिजेल.
जर तुम्हाला फॅटी लिव्हर सारख्या समस्या झाल्या तर तुमच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. फॅटी लिव्हरच्या समस्येला स्टीटोसिस देखील म्हणटले जाते. स्टीटोसिस झाल्यावर तुमच्या सकृतामध्ये जास्त प्रमाणात चरबी निर्माण होते. त्यासोबतच जेव्हा तुमचं यकृत सामान्य पद्धतीनं चरबी प्रक्रिया करू शकत नाही त्यावेळी त्यामध्ये अतिरिक्त चरबी जमा होण्यास सुरूवात होते. लठ्ठपणा, मधुमेह किंवा उच्च ट्रायग्लिसराइड्ससारख्या काही इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना फॅटी लिव्हर होण्याचा धोका असतो.
फॅटी लिव्हरचे एकूण दोन मुख्य प्रकार आहेत :
अल्कोहोलिक फॅटी लिव्हर जास्त प्रमाणात मद्यपान केल्यामुळे होतो. तुमचे यकृत तुम्ही पित असलेल्या बहुतेक अल्कोहोलचे रेणू तोडते, परंतु या प्रक्रियेत त्याचे नुकसान देखील होते. तुम्ही जितके जास्त मद्यपान कराल तितके तुमचे यकृताचे आरोग्य खराब होते. अल्कोहोलिक फॅटी लिव्हर हा आजार अल्कोहोलशी संबंधित आहे. काही रुग्णांमध्ये यामुळे अल्कोहोलिक हेपेटायटीस आणि लिव्हर सिरोसिस देखील होऊ शकत ज्याचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.
नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर अल्कोहोलशी संबंधित नाही. एखाद्या व्यक्तीच्या यकृताच्या वजनाच्या 5% किंवा त्याहून अधिक वजन केवळ चरबीने बनलेले असते तेव्हा त्याला नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर हा आजार होऊ शकतो. डॉक्टरांना नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आजाराचे नेमके कारण सांगितले नसले तरी, हा आहार वजन वाढल्यामुळे आणि लठ्ठपणाच्या समस्यामुळे होऊ शकतात.
तुम्हाला फॅटी लिव्हरच्या समस्यांना दूर ठेवायचे असेल तर तुमच्या आहारामध्ये हेल्दी चरबी, साखर, मीठ आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थांचे सेवन करणे टाळावे कारण यामुळे फॅटी लिव्हरच्या समस्या उद्भवतात. प्रक्रिया केलेले अन्न- पॅक केलेले स्नॅक्स, बिस्किटे, बर्गर, चिप्स, तळलेले पदार्थ आणि गोठलेले पदार्थांचे सेवन टाळावेत. कार्बोहायड्रेट्स- पांढरा ब्रेड, पांढरा भात आणि पांढरा पास्ता यासारख्या गोष्टी फॅटी लिव्हरचा धोका वाढवतात. सॅच्युरेटेड फॅट आणि ट्रान्स फॅट- बाहेरून येणारे बटर, क्रीम, रिफाइंड तेल यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स भरपूर असतात, ज्यांचे अतिसेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. कोल्ड्रिंक्स आणि एनर्जी ड्रिंक्समध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. यामुळे शरीरात फॅटी लिव्हर आणि साखरेची पातळी वाढते.