महिला प्रीमियर लीग स्पर्धेत बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सचा सामना गुजरात जायंट्सशी होत आहे. दोन्ही संघ त्यांचे शेवटचे सामने गमावल्यानंतर विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करतील. दिल्ली कॅपिटल्सने त्यांचा शेवटचा सामना यूपी वॉरियर्सविरुद्ध गमावला तर गुजरातला मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करावा लागला होता.गेल्या दोन हंगामात शेवटच्या स्थानावर राहिलेला गुजरात सध्या या हंगामातही शेवटच्या स्थानावर आहे तर उत्तर प्रदेशकडून झालेल्या पराभवानंतर दिल्ली चौथ्या स्थानावर घसरली आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये यापूर्वी चार वेळा आमनेसामने आल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सन तीन वेळा गुजरात जायंट्सवर मात केली आहे.गुजरातचा संघ ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू अॅशले गार्डनरवर अवलंबून आहे. तिने या हंगामात 141 धावा करत संघासाठी जोरदार कामगिरी केली आहे. दरम्यान नाणेफेकीचा कौल दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे.
दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेन लेनिंग म्हणाली की, ‘गोलंदाजी करणार आहे. हा ट्रेंड आहे असे दिसते. त्यामुळे आमच्या गोलंदाजांना सुरुवातीलाच विकेट घेण्याची चांगली संधी मिळते. एक बदल केला असून रेड्डीऐवजी तितासचा प्लेइंग 11मध्ये समावेश केला आहे. आज रात्री विजय मिळवण्यासाठी आमच्यासाठी हा सर्वोत्तम संघ आहे असे आम्हाला वाटते. तितास नेटमध्ये खूप चांगली गोलंदाजी करत आहे. नेहमीच सुधारणा करायची असते – तुम्ही जिंकलात किंवा हरलात तरीही.’
गुजरात जायंट्सची कर्णधार गार्डनरने सांगितलं की, ‘आठवडा चांगला गेला. आम्ही तीन सामने खूप लवकर खेळलो, त्यामुळे आम्हाला बॅटरी रिचार्ज करण्याची आणि चांगला सराव करण्याची संधी मिळाली. आम्हाला स्पष्टपणे माहित आहे की बंगळुरू वडोदरापेक्षा वेगळा असणार आहे. या ठिकाणी खूप जास्त उसळी आहे. ते लवकर जुळवून घेण्याबद्दल आहे. कर्णधार म्हणून ते शांत राहण्याचा आणि सर्वोत्तम निर्णय घेण्याबद्दल आहे. दोन बदल केले आहेत, फोबी लिचफिल्ड आणि मेघना सिंग.’
गुजरात जायंट्स महिला (प्लेइंग इलेव्हन): बेथ मुनी (विकेटकीपर), हरलीन देओल, फोबी लिचफील्ड, ॲशले गार्डनर (कर्णधार), डिआंड्रा डॉटिन, सिमरन शेख, तनुजा कंवर, भारती फुलमाली, काशवी गौतम, प्रिया मिश्रा, मेघना सिंग.
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, मेग लॅनिंग (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, मॅरिझाने कॅप, अॅनाबेल सदरलँड, जेस जोनासेन, सारा ब्राइस (विकेटकीपर), निकी प्रसाद, शिखा पांडे, तितस साधू, मिन्नू मणी.