मराठी अभिनेत्री पर्ण पेठे ही नेहमीच आपल्या अभिनयामुळे चर्चेत असते. पर्ण पेठेचं लग्न अभिनेता आलोक राजवाडेसोबत झालं आहे.
आलोक राजवाडे हादेखील अभिनेता आहे. या दोघांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे.
आलोक आणि पर्ण हे कॉलेजपासून एकमेकांना ओळखत होते. ते दोघेही एकत्र नाटकात काम करायचे.
त्यांनी पहिल्या नाटकात भाऊ-बहिणीचा रोल केला होता. त्यानंतर अनेक नाटकांसाठी त्यांच्या भेटीगाठी वाढल्या.
काम करताना त्यांनी ओळख वाढली. त्यांचे विचारही जुळले. त्यांना एकत्र काम करताना खूप मज्जा यायची.
पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्या दोघांनी २९ फेब्रुवारी २०२६ रोजी लग्नगाठ बांधली.
या दोघांनी आपल्या लग्नाचा फार गाजावाजा केला नाही. त्यांनी कुटुंबियांच्या उपस्थित अगदी साधेपणात कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला.
पर्ण पेठे आणि आलोक राजवाडेच्या लग्नाचा वाढदिवस हा चार वर्षातून एकदा येतो.