भाजपचे सरचिटणीस बी. एल संतोष पुढील आठवड्यात गोव्यात येणार आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यक्रमालाउपस्थित राहणार.
Sattari News: सत्तरीत शिवरात्रीचा गजर; भाविकांकडून महादेवाला दुग्धाभिषेकमासोर्डे येथील श्री शांतादुर्गा रवळनाथ मंदिरात सकाळपासून शिवरात्रौत्सव निमित्त भाविकांची मोठी गर्दी होती. भाविकांतर्फे दुग्धाभिषेक करण्यात आला. तर म्हादई नदीच्या काठावर सुध्दा भाविकांनी भेट देऊन शिवलिंगावर अभिषेक केला. दोन दिवस चालू असलेल्या उत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी संपन्न झाले.
South Goa: दक्षिण गोव्यात शिवभक्तांची गर्दीकेपे येथील सोमेश्वर मंदिरात शिवभक्तांनी गर्दी केली आहे.
Mahashivratri in Goa: 'हर, हर, महादेव..!'. मुळगावात पहिल्यांदाच महाशिवरात्रीचा उत्साहमुळगाव येथील पुरातन 'रामनाथ' स्थळी यंदा प्रथमच महाशिवरात्रीचा उत्साह. शेकडो भाविकांकडून लिंगाभिषेक.
CM Sawant Goa: हरवळे मंदिर परिसराचा आध्यात्मिक पर्यटनाच्या दृष्टीने विकास होणार - मुख्यमंत्रीहरवळे मंदिर परिसराचा "आध्यात्मिक पर्यटन"च्या दृष्टीने सुमारे १७ कोटी खर्चून विकास होणार. निविदा जारी. लोकांनी स्वच्छता राखावी - मुख्यमंत्री. हरवळेत श्री रूद्रेश्वर देवस्थानात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुलक्षणा सावंत यांच्यासह उपस्थित राहून अभिषेक केला. दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती.
Mahashivratri 2025: महाशिवरात्रीनिमित्त तांबडी सुर्ला येथील महादेव मंदिरात मुख्यमंत्री सावंत यांनी केली प्रार्थनामुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आमदार गणेश गावकर यांच्यासह सत्तरीतील प्राचीन श्री महादेव मंदिर, तांबडी सुर्ला येथे भेट देऊन प्रार्थना केली.
Rudreshwar Temple