PAK vs BAN : औपचारिक सामन्यात शेवट गोड कोण करणार? अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग 11
GH News February 27, 2025 12:09 AM

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तान आणि बांग्लादेश या दोन्ही संघांची नाचक्की झाली आहे. आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे उपांत्य फेरीच्या आशा मात्र मावळल्या आहेत. त्यामुळे शेवटचा सामना दोन्ही संघांसाठी औपचारिक असणार आहे. पण लाज राखण्यासाठी दोन्ही संघ विजयाचा प्रयत्न करतील. एका संघाला या स्पर्धेतील तिन्ही सामन्यात पराभूत होऊन जावं लागणार आहे. त्यामुळे असा शेवट कोणत्याच संघाल नको असेल. त्यामुळे विजयासाठी दोन्ही संघांची धडपड असेल. पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश सामना गुरुवारी दुपारी 2.30 वाजता होईल आणि टॉस 2 वाजता (भारतीय वेळेनुसार) होईल. हा सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.

रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवरील खेळपट्टी उष्णतेमुळे संथ असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल. पण जसजसा खेळ पुढे जाईल तसतसा पृष्ठभाग फलंदाजांना अनुकूल होण्याची शक्यता आहे. मधल्या षटकात फिरकीपटूंना पृष्ठभागावर थोडी पकड मिळू शकते.

दोन्ही संघांची संभावित प्लेइंग 11

पाकिस्तानचा संभावित इलेव्हन: इमाम-उल-हक, बाबर आझम, उस्मान खान, मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि विकेटकीपर), सलमान आगा, फहीम अश्रफ, कामरान गुलाम, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद.

बांगलादेशची संभावित प्लेइंग इलेव्हन: तन्झिद हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मेहदी हसन मिराझ, तौहिद ह्रदॉय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्लाह, जाकेर अली, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, नाहिद राणा, मुस्तफिजुर रहमान

पाकिस्तान आणि बांग्लादेशचा संपूर्ण संघ

पाकिस्तान संघ: मोहम्मद रिझवान (विकेटकीपर आणि कर्णधार), बाबर आझम, फखर जमान, कामरान गुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अश्रफ, खुशदिल शाह, सलमान अली आगा, उस्मान खान, अबरार अहमद, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहफरी, नसीम शाह.

बांगलादेश संघ: तनजीद हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मेहिदी हसन मिराझ, तौहिद हृदोय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, जाकेर अली, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, नाहिद राणा, तन्झिम हसन साकिब, परवेझ नसुम्या अहमद, सोमोनया अहमद, मुशफिकर रहमान.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.