महाराष्ट्रातील सहा पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या भरधाव इनोव्हा रेंट-अ कारने ॲक्टिव्हा दुचाकीला बेदरकारपणे धडक दिल्याने म्हापसा हाऊसिंग स्लोप ते शिवोली रोडवर भीषण अपघात झाला. एक महिला आणि तिच्या 12 वर्षाच्या मुलाला घेऊन जाणारी दुचाकी जवळपास 10 मीटर खेचून नेली. धुळेर येथे फुटबॉल सामन्यासाठी मुलाला सोडण्यासाठी ती जात होती.
Harvalem Goa: श्री रुद्रेश्वर देवस्थान हरवळे येथे पोलिस बंदोबस्त तैनातश्री रुद्रेश्वर देवस्थान हरवळे येथे महाशिवरात्रीच्या निमित्त पोलिस उप अधीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैनात. उत्सव सुरळीत सुरु.
Goa News: प्रशांत (बाळा) नाईक यांच्याकडून श्रीब्राह्मणदेव मंदिराचे सुशोभीकरणश्री प्रशांत (बाळा) नाईक माजी सरपंच विद्यामान पंच यांनी श्री ब्राह्मण देव मंदिराचे फरशी, छत व सुशोभीकरणाचे काम त्यांचे आजोबा स्वर्गीय भगवान म्हाळू नाईक यांच्या स्मरणार्थ केले.
Shivratri Goa: नागझर कुर्टी येथील नूतन शिव मंदिराचा शिलान्यासनागझर कुर्टी येथील नूतन शिव मंदिराचा शिलान्यास मा.विजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते संपन्न.
Goa News Updates: बी. एल संतोष पुढील आठवड्यात येणार गोव्यातभाजपचे सरचिटणीस बी. एल संतोष पुढील आठवड्यात गोव्यात येणार आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यक्रमालाउपस्थित राहणार.
Sattari News: सत्तरीत शिवरात्रीचा गजर; भाविकांकडून महादेवाला दुग्धाभिषेकमासोर्डे येथील श्री शांतादुर्गा रवळनाथ मंदिरात सकाळपासून शिवरात्रौत्सव निमित्त भाविकांची मोठी गर्दी होती. भाविकांतर्फे दुग्धाभिषेक करण्यात आला. तर म्हादई नदीच्या काठावर सुध्दा भाविकांनी भेट देऊन शिवलिंगावर अभिषेक केला. दोन दिवस चालू असलेल्या उत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी संपन्न झाले.
South Goa: दक्षिण गोव्यात शिवभक्तांची गर्दीकेपे येथील सोमेश्वर मंदिरात शिवभक्तांनी गर्दी केली आहे.
Mahashivratri in Goa: 'हर, हर, महादेव..!'. मुळगावात पहिल्यांदाच महाशिवरात्रीचा उत्साहमुळगाव येथील पुरातन 'रामनाथ' स्थळी यंदा प्रथमच महाशिवरात्रीचा उत्साह. शेकडो भाविकांकडून लिंगाभिषेक.
CM Sawant Goa: हरवळे मंदिर परिसराचा आध्यात्मिक पर्यटनाच्या दृष्टीने विकास होणार - मुख्यमंत्रीहरवळे मंदिर परिसराचा "आध्यात्मिक पर्यटन"च्या दृष्टीने सुमारे १७ कोटी खर्चून विकास होणार. निविदा जारी. लोकांनी स्वच्छता राखावी - मुख्यमंत्री. हरवळेत श्री रूद्रेश्वर देवस्थानात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुलक्षणा सावंत यांच्यासह उपस्थित राहून अभिषेक केला. दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती.
Mahashivratri 2025: महाशिवरात्रीनिमित्त तांबडी सुर्ला येथील महादेव मंदिरात मुख्यमंत्री सावंत यांनी केली प्रार्थनामुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आमदार गणेश गावकर यांच्यासह सत्तरीतील प्राचीन श्री महादेव मंदिर, तांबडी सुर्ला येथे भेट देऊन प्रार्थना केली.
Rudreshwar Temple