पंप उत्पादक कंपनी देणार २०० टक्के लाभांश, रेकॉर्ड तारीखही केली जाहीर
ET Marathi February 28, 2025 12:45 PM
मुंबई : भारतातील आघाडीच्या पंप आणि व्हॉल्व्ह उत्पादक केएसबी लिमिटेडने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. निकाल जाहीर करताना कंपनीने भागधारकांनी खूशखबर दिली आहे. केएसबी लिमिटेडने भागधारकांसाठी लाभांश जाहीर केला आहे. यासाठी रेकाॅर्ड तारीखही निश्चित केली आहे. इतका मिळणार लाभांशकेएसबी लिमिटेडने २०० टक्के अंतिम लाभांश जाहीर केला आहे. भागधारकांना प्रति शेअर ४ रुपये लाभांश देण्यात येणार आहे. लाभांशासाठी २ मे २०२५ ही रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. नफा ३३ टक्के वाढलाडिसेंबर तिमाहीत केएसबी लिमिटेडचा नफा ३३ टक्के वाढून ७३ कोटी रुपयांवर गेला. गेल्या वर्षी या तिमाहीत नफा ५४.९ कोटी रुपये होता. केएसबी लिमिटेडचा महसूल २०.५ टक्के वाढून ७२६.४ कोटी रुपये झाला. बाजारात त्यांच्या पंप आणि व्हॉल्व्हची जोरदार मागणी यातून दिसते. त्याच वेळी EBITDA २६.५ टक्के वाढून ८५ कोटी रुपये झाला आणि मार्जिन देखील ११.७ टक्क्यांपर्यंत वाढले. कंपनीबद्दल बाजार बंद झाल्यानंतर केएसबी लिमिटेडने निकाल जाहीर केले. कंपनीचा शेअर्स गुरुवारी १.२६ टक्के घसरून ६०९.२५ रुपयांवर बंद झाला. केएसबी लिमिटेड ही जर्मनीस्थित केएसबी ग्रुपचा एक भाग आहे. कंपनी इमारत, उद्योग, खाणकाम आणि ऊर्जा क्षेत्रांसाठी पंप, व्हॉल्व्ह आणि सिस्टीम तयार करते. ही कंपनी पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकासात मोठी भूमिका बजावत आहे.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.