पुणे: स्वारगेट येथील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला पुणे पोलिसांनी अटक केली असून, त्याला रात्रीच्या सुमारास लष्कर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले. स्वारगेट पोलीस ठाण्याच्या पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्याच्या गावातून अटक केली.
आरोपीला सध्या लष्कर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले असून, आज (बुधवार) दुपारी तीननंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या संदर्भात पोलीस उपायुक्त (झोन २) स्मार्तना पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, "आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे."