आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील 10 व्या सामन्यात बी ग्रुपमधील अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमेनसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 2 वाजता टॉस झाला. अफगाणिस्तानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार हशमतुल्लाह शाहीदी याने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. आता अफगाणिस्तान ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर किती धावा करतात? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील तिसरा आणि अखेरचा सामना आहे. हा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीत पोहचणार आहे. तर पराभूत संघाचं आव्हान संपुष्ठात येणार आहे. अफगाणिस्तानने 2 पैकी 1 सामना जिंकला आहे. तर ऑस्ट्रेलियाने 1 सामना जिंकलाय तर एक सामना पावसामुळे वाया गेला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे 3 पॉइंट्स आहेत. तर अफगाणिस्तानच्या खात्यात 2 गुण आहेत. अफगाणिस्तानने गेल्या सामन्यात इंग्लंडचा धुव्वा उडवत स्पर्धेतील आव्हान कायम राखलंय. त्यामुळे अफगाणिस्तानचा विश्वास दुणावलेला आहे. तर ऑस्ट्रेलियाचा गेला सामना हा पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया थेट 22 फेब्रुवारीनंतर एक्शन ऑन फिल्ड उतरणार आहे.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस, ॲलेक्स केरी (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा आणि स्पेन्सर जॉन्सन.
अफगाणिस्तान प्लेइंग इलेव्हन : हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, सेदिकुल्ला अटल, रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, रशीद खान, नूर अहमद आणि फजलहक फारुकी.