सेलू (जि.परभणी) : ‘‘भाजपच्या मागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ‘फॅसिस्ट’ विचारधारा आहे. भाजपला हलविण्यासाठी सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांना बरोबर घेऊन काम करावे लागेल,’’ असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप)पॉलिट ब्युरोचे केंद्रीय समन्वयक प्रकाश करात यांनी गुरुवारी केले.
‘माकप’च्या राज्य अधिवेशनाचे उद्घाटन कारत यांच्या हस्ते आज शहरात झाले.यावेळी पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य माजी खासदार नीलोत्पल बसू, डॉ. अशोक ढवळे, राज्य सचिव उदय नारकर, माजी आमदार नरसय्या आडम, जे.पी. गावित आदी उपस्थित होते. अधिवेशनात सुमारे ४५० निवडक प्रतिनिधी उपस्थित होते.
कारत म्हणाले, की नवउदारमतवादी धोरणातून भांडवलदारांचे हित जपले जात आहे. हुकूमशाही आणि बळाच्या जोरावर हिंदुत्ववादी कार्यक्रम राबविला जात आहे. केंद्रीय यंत्रणाचा दुरुपयोग केला जात आहे.