ALSO READ:
मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही ट्रक मुंबईहून नागपूरच्या दिशेने येत असताना एका ट्रक चालकाने त्याचा ट्रक गांधी खापरी परिसरात समृद्धी चॅनल येथे उभारला होता. त्या ट्रकच्या मागे एक अजून ट्रक उभारला होता. नो पार्किंग झोन मध्ये हे ट्रक उभे होते.ALSO READ:
गुरुवारी सकाळी तिसरा ट्रक मुंबईहून नागपूरच्या दिशेने जात असताना ट्रक चालकाला रस्त्यावर अंधार असल्याने दोन्ही उभे ट्रक दिसले नाही आणि ट्रक जाऊन धडकला. धडक एवढी जोरदार होती की दोन्ही ट्रकच्या केबिन पूर्णपणे चिरडल्या गेल्या आणि ट्रकचा क्लिनर त्यात अडकून गंभीर जखमी होऊन तिथेच मरण पावला. तर इतर दोघे ट्रक चालक गंभीर जखमी झाले.ALSO READ:
अपघाताची माहिती मिळतातच हिंगणा पोलीस घटनास्थळी पोहोचले पहिल्या ट्रकचालकाने आपले ट्रक तिथून पळवून नेले. या प्रकरणी तिन्ही ट्रक चालकांच्या विरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आले आहे.Edited By - Priya Dixit