अफगाणिस्तान उपांत्य फेरी गाठेल! पण दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंड सामन्यात असं असेल समीकरण
GH News March 01, 2025 01:08 AM

चॅम्पियन्स ट्रॉफीत तीन सामने तर पावसानेच खेळले अशी मिश्किल चर्चा क्रीडाप्रेमींमध्ये रंगली आहे. पावसामुळे ब गटातील उपांत्य फेरीचं गणित किचकट झालं. त्यात ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान सामन्यातही पावसाने हजेरी लावली आणि उपांत्य फेरीचं गणित अजून लांबलं. सामना रद्द झाल्याने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांना प्रत्येकी एक गुण मिळाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीचं तिकीट मिळालं. पण अफगाणिस्तान आणि दक्षिण अफ्रिकेचं गणित जर तर वर येऊन ठेपलं आहे. ब गटातील साखळी फेरीतील शेवटचा सामना दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. या सामन्यावर आता उपांत्य फेरीचा चौथा संघ ठरणार आहे. तसं पाहिलं तर उपांत्य फेरीचं तिकीट दक्षिण अफ्रिकेलाच मिळेल. कारण अफगाणिस्तानला उपांत्य फेरी गाठायची असेल तर नेट रनरेटचं गणित खूपच कठीण आहे. अफगाणिस्तानसाठी ते गणित इंग्लंडला सोडवणं खूपच कठीण जाणार आहे.

ऑस्ट्रेलियाने 4 गुण मिळवत उपांत्य फेरी गाठली आहे. दक्षिण अफ्रिकेचे 3 गुण असून नेट रनरेट हा +2.140 इतका आहे. यासह गुणतालिकेत दक्षिण अफ्रिकन संघ दुसऱ्या स्थानावर आहे. तर अफगाणिस्तानचा संघ 3 गुण आणि -0.990 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. आता हे गणित पाहता दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात नेट रनरेटचा खूपच फरक आहे. त्यामुळे उपांत्य फेरीसाठी दक्षिण अफ्रिकेचं पारडं जड आहे. त्यात दक्षिण अफ्रिकेने इंग्लंडविरुद्धचा सामना हरला तरी नेट रनरेटचं गणित काय सुटेल असं वाटत नाही.

अफगाणिस्तानचं संपूर्ण गणित आता इंग्लंडच्या विजयासोबत कॅलक्युलेशनवर आहे. इंग्लंडची प्रथम फलंदाजी आली तर दक्षिण अफ्रिकेला 207 धावांनी पराभूत करावं लागेल. जर दुसऱ्या डावात फलंदाजीची वेळ आली तर दक्षिण अफ्रिकेने दिलेलं टार्गेट 11.1 षटकात पूर्ण करावं लागेल. हे समीकरण 300 धावांच्या गणितावर काढलं आहे. धावसंख्येच्या हिशेबाने ते कमी अधिक होईल. पण या सामन्यातही पाऊस पडला तर दक्षिण अफ्रिकेचं तिकीट कन्फर्म होईल. आता भारताची उपांत्य कोणाशी गाठ पडेल हा देखील चर्चेचा विषय आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.