शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. आदित्य यांनाच विरोधी पक्षनेते करावे असं ठाकरेंच्या शिवसेनेतील काही आमदारांचे मत आहे. मातोश्रीवर आमदारांची बैठक झाली. यावेळी विरोधी पक्षनेतेपदाच्या चर्चे दरम्यान काही आमदारांनी आदित्य ठाकरेंच्या नावाला पसंती दिल्याची माहिती आहे. आदित्य ठाकरे यांच्या रुपाने एक तरुण विरोधी पक्ष नेता राज्याला मिळू शकतो आणि त्याचा फायदा पक्षाला होऊ शकतो, असं ठाकरेंच्या काही नेत्यांचं मत आहे.
Mumbai Local Mega Block : आज रात्री मुंबई लोकलच्या दोन्ही प्रमुख लाइनवर मेगाब्लॉकमुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर ग्रॅण्ट रोड ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान गर्डर कामासाठी शनिवारी रात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. रात्री 10 ते सकाळी 11 वाजेपर्यंत असा तब्बल 13 तासांचा हा मोठा ब्लॉक असणार आहे.
Manikrao Kokate Live : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचं भवितव्य आज ठरणारकृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना झालेल्या २ वर्षांच्या शिक्षेप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालय आज देणार अंतिम निकाल दिला जाण्याची शक्यता आहे. कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती मिळण्यासाठी कोकाटेंनी सत्र न्यायालयात अपील केलं होतं. अपिलावर सुनावणी पार पडल्यानंतर आज न्यायालय निकाल देणार आहे. कोकाटेंना झालेल्या २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती न मिळाल्यास मंत्रीपद धोक्यात येऊन आमदारकी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. आर्थिक उत्पन्नाचे बनावट दस्तावेज तयार करून मुख्यमंत्र्यांच्या १० टक्के राखीव कोट्यातून सदनिका लाटल्याप्रकरणी कोकाटे यांना २ वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा झाली आहे.