पहाटेपासून राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या अनेक भागात पाऊस कोसळत आहे. त्यामुळे आज काहीअंशी जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रेठरे बुद्रुक : भारतीय लष्करातील सेवेत असणाऱ्या सचिन बबनराव कापूरकर यांचे काल रात्री अल्प आजाराने निधन झाले. येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. ते आठवड्यापूर्वी सुटीवर आले होते. सध्या ते चंडीगड सैन्य दलात कार्यरत होते.
Jagdeep Dhankhar LIVE : उपराष्ट्रपती जगदीप धनकड आज महाराष्ट्रात एक दिवसाच्या दौऱ्यावरनवी दिल्ली : उपराष्ट्रपती जगदीप धनकड आज (ता. १) महाराष्ट्रात एक दिवसाच्या दौऱ्यावर येणार आहेत. या भेटीदरम्यान उपराष्ट्रपती मुंबईतील केपीबी हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्सच्या वार्षिक दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील, असे उपराष्ट्रपती कार्यालयातर्फे कळविले आहे.
Maharashtra Heat Wave Live : महाराष्ट्रासह देशाच्या अनेक राज्यांमध्ये मार्च महिन्यापासून तीव्र उष्णतेच्या लाटा; हवामान विभागाचा इशाराLatest Marathi Live Updates 1 March 2025 : देशाच्या बहुतांश भागात यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक ठरणार आहे. महाराष्ट्रासह देशाच्या अनेक राज्यांमध्ये मार्च महिन्यापासूनच तीव्र उष्णतेच्या लाटा येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना सोशल मीडियावरून पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘‘स्वारगेट स्थानकात बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात कुणाचीही गय केली जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. या संपूर्ण घटनेची ‘मिनिट टू मिनिट’ चौकशी करण्याची सूचना पोलिसांना दिली आहे,’’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. उपराष्ट्रपती जगदीप धनकड आज महाराष्ट्रात एक दिवसाच्या दौऱ्यावर येणार आहेत. नेपाळची राजधानी काठमांडूसह भारतातील बिहार व ईशान्य भारताला मध्यम स्वरूपाच्या भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ६.१ इतकी होती. तर, उत्तराखंडमधील चामोली जिल्ह्यातील बद्रीनाथ धाम येथील माना गावात शुक्रवारी सकाळी सव्वासातच्या दरम्यान हिमस्खलन होऊन सीमा रस्ते संघटनेचे (बीआरओ) रस्त्याच्या कामावरील २५ कामगार अडकले आहेत. त्याचबरोबर राज्यात अजूनही काही भागांत थंडी कमी झालेली दिसत नाहीये. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..