Israel Hamas Ceasefire: जगात शांतता निर्माण करण्याचे दोन प्रयत्न अयशस्वी होताना दिसत आहे. रशिया-युक्रेन युद्धात अमेरिकीची शिष्टाई युक्रेन स्वीकारण्यास तयार नाही. त्याचवेळी इस्त्राइल आणि हमास यांच्यात सुरु असलेली चर्चा विस्कटली आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम चर्चा अयशस्वी झाली आहे. युद्धविरामाच्या दुसऱ्या टप्प्याबाबत दोघांमध्ये चर्चा होणार होती. मात्र ही चर्चा निष्फळ ठरल्याचे हमासने अधिकृतपणे जाहीर केले आहे.
हमासचा प्रवक्ता हाझेम कासिम याने या संदर्भात अल-अरबी टीव्हीला सांगितले की, गाझामधील युद्धविरामाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सध्या कोणत्याही वाटाघाटी सुरू नाहीत. दरम्यान, हुथी नेता अब्दुल-मलिक अल-हौथीने इस्रायलला युद्धाची धमकी दिली आहे. त्याने म्हटले की गाझामध्ये पुन्हा युद्ध सुरु झाले तर आम्ही आमचे सैन्य उतरवणार आहे.
गाझा आणि इस्त्रायलमध्ये दीर्घ काळापासून युद्ध सुरु आहे. युद्धविरामसंदर्भात पहिल्या टप्प्यातील चर्चा झाली. इस्त्रायल आणि हमास दोन्ही बाजूंनी कैद्यांची सुटका करण्यात आली. पहिला टप्पा झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील चर्चेकडे जगाचे लक्ष लागले होते. गाझामधील युद्ध संपवणे हा दुसऱ्या टप्प्यातील युद्धाचा हेतू होता. तसेच युद्धा दरम्यान ज्या लोकांना कैदी बनवण्यात आले होते, त्यांची सुटका करणे हा एक हेतू होता.
हमासने युद्धविरामची चर्चा विस्कटल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे इस्त्रायल पुन्हा एकदा गाझावर हल्ला करण्याची शक्यता आहे. यमनमध्ये इराण समार्थित हुती नेता अब्दुलमालिक अल-हूती यांनी म्हटले की, गाझामध्ये इस्त्रायलने युद्ध सुरु केले तर आम्हीसुद्धा इस्त्रायलवर हल्ला करणार आहोत.
हूतीच्या नेत्याने रमजानसंदर्भात एक वक्तव्य केले होते. त्यात पॅलिस्टीनी लोकांचा उल्लेख केला होता. हमासची सैन्य ब्रिगेड पॅलिस्टीनचे संरक्षण करण्यासाठी कटीबद्ध आहे. 7 ऑक्टोंबर 2023 पासून इस्त्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरु आहे. 15 महिन्यांपासून सुरु असलेले युद्ध थांबण्याचे संकेत होते. परंतु आता पुन्हा युद्ध सुरु होण्याची भीती आहे.