घराला लागलेल्या भीषण आगीत मुलीसह तिघांचा मृत्यू
Webdunia Marathi March 01, 2025 06:45 PM

Hyderabad News: हैदराबादमध्ये घराला लागलेल्या आगीत सात वर्षांच्या मुलीसह तिघांचा मृत्यू झाला.

ALSO READ:

मिळालेल्या माहितीनुसार हैदराबादच्या पुप्पलागुडा येथे शुक्रवारी संध्याकाळी सिलिंडरचा स्फोट झाल्याने एका घराला आग लागली. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागली तेव्हा इमारतीत एकूण आठ सदस्य उपस्थित होते, त्यापैकी सात वर्षांच्या मुलीसह कुटुंबातील तीन सदस्यांचा गुदमरून मृत्यू झाला.

ALSO READ:

तसेच पाच जणांना अग्निशमन दलाचे जवान, पोलीस कर्मचारी आणि स्थानिक लोकांनी वाचवले. त्यापैकी दोन जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ALSO READ:

Edited By- Dhanashri Naik
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.