प्रत्येकांच्या स्वयंपाकघरात टोमॅटो हे असतेच. जेवण बनवताना डाळी आणि भाज्यांमध्ये टोमॅटोचा वापर केला जातो.तसेच रसाळ टोमॅटो हे विविध चवदार पदार्थांची उत्तम चव वाढवतात. काही लोकांना टोमॅटो इतका आवडतो की ते जेवणासोबत कच्चे टोमॅटोचे काप खातात. अशावेळी जेव्हा आपण बाजारात भाज्या खरेदी करायला जातो तेव्हा एकाच वेळी 1-2 किलो टोमॅटो खरेदी करतो आणि फ्रिजमध्ये आणून ठेवतो. यासोबत भाजीपाला काही दिवस फ्रिजमध्ये ठेवणे चांगले आहे. पण जास्त वेळ फ्रिजमध्ये ठेवून खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. पण तुम्हाला माहित आहे का की फ्रिजमध्ये टोमॅटो कधी ठेऊ नये? जर तुम्ही सुद्धा टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवत असाल तर आजच ही सवय बदला. अशातच टोमॅटो फ्रिजमध्ये का ठेवू नयेत आणि ते साठवण्याचा योग्य मार्ग कोणता आहे हे जाणून घेऊयात. मात्र त्याआधी ज्यांच्या घरी फ्रिजनाही किंवा फ्रिज खराब झाला असेल ते देखील टोमॅटो १० दिवस साठवून ठेवण्यासाठी हे सोपे हॅक वापरू शकता.
टोमॅटो फ्रीजमध्ये का ठेवू नयेत?
मास्टर शेफ पंकज भदौरिया यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्यांनी टोमॅटो फ्रिजमध्ये का ठेऊ नये याबद्दल सांगितले आहे. कारण टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवल्याने त्याची चव खराब होऊ शकते. थंड तापमानामुळे टोमॅटोमधील एन्झाईम्स त्यांच्या पेशी सक्रिय राहत नाही, ज्यामुळे टोमॅटो मऊ होतात. त्यासोबत टोमॅटोचा पोत देखील खराब होतो. फ्रीजचे तापमान टोमॅटो मधील पोषक घटकांना बदलते.
टोमॅटो साठवून ठेवण्याची योग्य पद्धत
टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवण्याऐवजी तुम्ही ते बाहेर थंड आणि कोरड्या जागी ठेवावे. पण यासाठी टोमॅटोचे हिरवे देठ काढून टाकणे सर्वात महत्वाचे आहे. आता ते एका प्लेट किंवा ट्रेमध्ये देठ काढलेली बाजू खाली ठेवा असे केल्याने टोमॅटो लवकर खराब होत नाही, आणि मऊ देखील पडत नाही. तसेच टोमॅटोची चवही बदलणार नाही. चव तशीच राहील. तसेच त्यांना ओलाव्याची कमतरता भासणार नाही.