Marathi Serial: मराठी मनोरंजन विश्वात सातत्याने नवनवीन प्रयोग होत आहेत. या मालिकांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत, तर अनेक मालिकांमध्ये लोकप्रिय कलाकारांची एन्ट्री झालेली आहे. तसेच अनेक नवीन मालिका सुरु झाल्या आहेत तर काही जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. यामध्ये झी मराठी वरील एक मालिका प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार आहे. तर एक नव्या दमाची मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘’ वाहिनीवर गेल्यावर्षी १८ मार्चला एक मालिका सुरू करण्यात आली ती म्हणजे ‘’. या मालिकेचा विषय काहीसा वेगळा होता. अक्षया हिंदळकर आणि अक्षय म्हात्रे यांची नवी जोडी या मालिकेत मुख्य भूमिका साकारत होती. यामध्ये या दोघांनी वसुंधरा आणि आकाश ही पात्र साकारली. या मालिकेत अनेक मजेदार ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळाले. पण, आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून नुकताच या मालिकेचा शेवटचा भाग शूट करण्यात आला आहे. यानंतर अभिनेत्री अक्षयाने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.
‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेच्या सेटवरील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत अक्षया हिंदळकरने लिहिले, “आज पाऊल निघत नव्हतं. चला निरोप घेते…मला या क्षणाला काय वाटतंय हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. पण या प्रवासात खूप चांगली माणसं भेटली. अनेक आठवणी माझ्याबरोबर घेऊन जात आहे. खूप प्रेम.”
दरम्यान, ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेत प्रेक्षकांना दमदार कलाकार मंडळी पाहायला मिळाली होती. वंदना सरदेसाई, मृणाल देशपांडे, सिद्धेश प्रभाकर, सुदेश म्हाशीलकर, वंदना गुप्ते या कलाकारांनी देखील या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. आता ‘पुन्हा कर्तव्य आहे’च्या जागी सायंकाळी ६ वाजता कोणती मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे लवकरच प्रेक्षकांना समजणार आहे.