मराठी इंडस्ट्रीतील सर्वात क्युट कपल म्हणजे सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर. सिद्धार्थ आणि मिताली यांच्या नावाचं हॅशटॅग TinyPanda चांगलंच फेमस झालं आहे.
सिद्धार्थ आणि मिताली या दोघांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. हे दोघेही पूर्वी दुसऱ्या कोणालातरी डेट करत होते.
२०१७ मध्ये सिद्धार्थ आणि मितालीची पहिली भेट झाली.त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो केलं. त्यांचं चॅटिंग सुरु झाले. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली.
२०१७ मध्ये सिद्धार्थ आणि मितालीची पहिली भेट झाली.त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो केलं. त्यांचं चॅटिंग सुरु झाले. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली.
काही कारणांनी त्या दोघांचेही पहिले नाते तुटले. त्यानंतर या दोघांच्या भेटीगाठी वाढल्या. त्यांच्यातील मैत्री अजूनच घट्ट होत गेली.
या दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवायला खूप आवडायचे. पुढे याच मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले. सिद्धार्थने व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी मितालीला प्रपोज केले होते.
सिद्धार्थ मितालीने ३ वर्षे एकमेकांना डेट केले. दोन वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. २०२१ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली.