Chhaava Box Office Collection: छावा चित्रपटाने रचला मोठा इतिहास, तिसऱ्या आठवड्यात केला ५०० कोटींचा टप्पा पार
Saam TV March 01, 2025 07:45 PM

अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा छावा चित्रपटाने मोठा विक्रम केला आहे. या चित्रपटाने जगभरात मोठ नावं कमावलं आहे. ऐतिहासिक नाट्यमय चित्रपट २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा रेकॉर्ड मोडणारा चित्रपट आहे. चित्रपट रिलीज झाल्यापासून या चित्रपटाची क्रेझ लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनमध्ये दिसत आहे. आतापर्यंत सिनेमाने किती गल्ला जमावला आहे हे जाणून घेऊया.

छावा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित आहे. चित्रपटात संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशलने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना अभिनेत्री आहे.

चित्रपटाने आतापर्यंत एकूण ५६३.७९ कोटींचा व्यवसाय केला आहे. तर केवळ भारतामध्ये या चित्रपटाने ४१२.९२ इतके कोटी कमावले आहेत. ५०० करोड रूपयांच्या क्लबमध्ये एन्ट्री करणारा छावा हा चित्रपट २०२५ मधील पहिला सिनेमा ठरला आहे.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' हा चित्रपट शिवाजी सावंत यांच्या 'छावा' या मराठी कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत, अक्षय खन्ना मुघल सम्राट औरंगजेबच्या भूमिकेत, आशुतोष राणा सरसेनापती हंबीराव मोहितेंच्या भूमिकेत, नील भूपालम अकबरच्या भूमिकेत, दिव्या दत्ता सोयराबाईंच्या भूमिकेत आणि डायना पेंटी झीनत-उन-निसा बेगमच्या भूमिकेत आहेत. छावा हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी हिंदीमध्ये प्रदर्शित झाला. प्रेक्षकांच्या मागणीमुळे या चित्रपटाची तेलुगू भाषेत ७ मार्चपासून प्रदर्शित होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.