चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया की दक्षिण अफ्रिका! कोणासोबत खेळायचं हे टीम इंडिया ठरवणार?
GH News March 01, 2025 11:07 PM

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचा थरार अंतिम टप्प्यात आला आहे. उपांत्य फेरीसाठी भारत, न्यूझीलंड, दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे चार संघ ठरले आहेत. अ गटातून भारत आणि न्यूझीलंड आणि ब गटातून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका हे संघ ठरले आहेत आहेत. साखळी फेरीतील शेवटचा सामना 2 मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना औपचारिक असला तरी उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचं गणित ठरवणार आहे. ब गटात दक्षिण अफ्रिकेने इंग्लंडला पराभूत करत टॉपचं स्थान पटकावलं आहे. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेचा सामना अ गटातील दुसऱ्या स्थानावरील संघाशी होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड सामन्याच्या निकालानंतर हे चित्र स्पष्ट होणार आहे. या सामन्यात विजयी संघ ऑस्ट्रेलियाशी, तर पराभूत होणारा संघ दक्षिण अफ्रिकेशी लढत करणार आहे. त्यामुळे भारताकडे उपांत्य फेरीत कोणाशी सामना करायचा? याचा पर्याय आहे. भारताने न्यूझीलंडला पराभूत केलं तर ऑस्ट्रेलियाशी लढत होईल. दुसरीकडे, न्यूझीलंडकडून पराभूत झाला तर दक्षिण अफ्रिका समोर असेल.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पावसामुळे बरंच चित्र बदलल्याचं पाहायला मिळालं. भारताचे सामने दुबईत होत असल्याने त्यात तसं काही विघ्न आलं नाही. तसेच पुढचे काही दिवस पाऊस पडेल असंही चित्र नाही. पण निसर्गाच्या लहरीपणाचा काही सांगता येत नाही. त्यामुळे सर्वच शक्यतांचा विचार करावा लागेल. भारताचा उपांत्य फेरीचा सामना 4 मार्चला दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होईल. तर न्यूझीलंडचा सामना 5 मार्चला होईल, पण हा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये होणार आहे. त्यामुळे पावसाचं गणित डोक्यात ठेवूनच गणित आखावं लागेल.

पाकिस्तानात पाऊस पडत असल्याने खऱ्या अर्थाने न्यूझीलंडची धाकधूक वाढली आहे. न्यूझीलंडला भारताविरूद्धचा सामना काहीही करून जिंकावाच लागेल. कारण स्पर्धेतलं पुढचं गणित त्याला कारणीभूत आहे. 5 मार्चला होणारा सामना पावासामुळे रद्द झाला तर 6 मार्च या राखीव दिवशी खेळला जाईल. पण या दिवशीही पावसाने हजेरी लावली तर मात्र अ गटात टॉपला असेल तरच फायदा आहे. कारण गटात टॉपला असलेल्या संघाला अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. त्यामुळे न्यूझीलंडला भारताविरूद्धचा सामना काहीही करून जिंकावाच लागेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.