पुणे : गेल्या काही दिवसांपासून सुतारवाडी मुख्य रस्त्यावर ड्रेनेज लाईनचं काम चालू आहे. हे काम करत असताना प्रशासनाने कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था व पर्यायी वाहतूक व्यवस्था केलेली नाही. या रस्त्यावर काम सुरु असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ड्रेनेज लाईनच्या कामावेळी सुतारवाडी मुख्य रस्ता खचला आहे.
सुतारवाडी-पाषाण परिसरातील नागरिकांना रोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे होण्याच्या घटना देखील वाढल्या आहेत. या नागरिक संतापले आहेत. संबंधित ठेकेदाराने कुठलीही सुरक्षा व्यवस्था व वाहतूक व्यवस्था लावलेली नाही. आज शिवनगर सुतारवाडी मुख्य रस्त्यावर संबंधित काम अर्धवट ठेवून ठेकेदार आणि त्याचे कामगार निघून गेले.
भला मोठा खड्डा आणि त्याला कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नाही आणि तो रस्ता सर्वांसमोरच खचला. अशा प्रकारे आणि संबंधित ठेकेदार सुतारवाडी पाषाण मधील रहिवाशांच्या जीवाशी का खेळत आहे? जर या प्रकारे कुठलाही मोठा अपघात झाला तर त्याची पूर्णपणे जबाबदारी संबंधित ठेकेदार व पुणे महानगरपालिकेचे असेल. संबंधित ठेकेदार व पुणे महानगरपालिकेवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्थानिक करत आहेत.