Mark Zuckerberg Viral Video: बायकोच्या वाढदिवशी झुकेरबर्गची जंपसूट मध्ये हवा; काय आहे नक्की कारण, पाहा वायरल व्हिडिओमध्ये
esakal March 02, 2025 03:45 AM

Mark Zuckerberg Surprises His Wife On Her 40th Birthday: नेहमीच आपल्या एकदम साध्या राहणीमानामुळे मेटा कंपनीचा सिईओ मार्क झुकेरबर्ग ओळखला जातो. सार्वजनिक ठिकाणी फिरताना असो किंवा कोणत्या मोठ्या कार्यक्रमात असो, तो आपल्याला फक्त टीशर्ट, हुडीज, जीन्स आणि खूपच साध्या फॉर्मल कपड्यात दिसतो. परंतु सध्या सोशल मीडियावर वायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तो चक्क जंपसूटमध्ये दिसला आहे. काय आहे त्यामागील कारण पुढे जाणून घेऊया.

नुकताच मार्क झुकेरबर्गची पत्नी प्रिसिला चॅनचा ४०वा वाढदिवस झाला. आणि याचेच औचित्य साधून मार्क झुकेरबर्गने एक हटके लुक ट्राय केला आहे. यामुळे तेथील सगळेच पाहुणे आश्चर्यचकित झाले. नेहमीच्या टक्सेडो ऐवजी त्याने ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यातील गाजलेल्या क्षणाची पुनरावृत्ती करत आपल्या पत्नीसोबत उपस्थित सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

सोशल मीडियावर वायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की, सुरुवातीला आपली पत्नी प्रिसिला चॅनच्या वाढदिवसासाठी मार्क झुकेरबर्ग एक फॉर्मल टक्सेडो घालून आला होता. परंतु काही वेळाने जेव्हा तो स्टेजवर गेला तेव्हा दोन व्यक्तींच्या मदतीने त्याने तो टक्सेडो फाडून टाकला आणि आतून चमकदार निळा जंपसूट घातल्याचे उघड केले. हाच पोशाख अमेरिकन गायक - गीतकार बेंसन बूने याने ग्रॅमी परफॉर्मन्सच्या वेळी "ब्युटीफुल थिंग्स" हे गाणे गाताना घातला होता.

अजून एक आश्चर्याची बाब म्हणजे त्याने इथेच न थांबता त्याच्या पत्नीसाठी चक्क एक गाणे सदर केले. यातून त्याचे त्याच्या पत्नीवरील असलेले प्रेम दिसून आले.

एवढेच नाही तर मार्क झुकेरबर्गने आपल्या इन्स्ट्राग्राम पोस्ट मध्ये म्हटले आहे की, "तुमच्या पत्नीचा ४०वा वाढदिवस एकदाच येतो! बेंसन बूने आणि त्याच्या नवीन गाण्यासाठी खास धन्यवाद!" आणि ही पोस्ट लगेचच व्हायरल झाली.

याव्यतिरिक्त हि पहिलीच वेळ नाही जेव्हा मार्क झुकेरबर्गने आपल्या नेहमीच्या टीशर्ट, हुडीज सोडून फॅशनमध्ये प्रयोग केला आहे. याआधीही, त्याने एका कार्यक्रमात एक आकर्षक हवाईयन शर्ट घालून हजेरी लावली होती. यावरूनच कळते की, गरज असल्यास आणि योग्य वेळी तो नवीन गोष्टी ट्राय करत असतो.

मार्क झुकेरबर्गचे आपल्या पत्नीवरील प्रेम व्यक्त करण्याची देखील ही पहिली वेळ नाही. गेल्या ऑगस्टमध्ये त्याने नामांकित कलाकार डॅनियल आर्शाम यांच्याकडून प्रिसिला चॅनची एक भव्य शिल्पकृती बनवून त्यांच्या बागेत ठेवली होती.

हार्वर्ड विद्यापीठापासून सुरू झालेली मार्क झुकेरबर्ग आणि प्रिसिला चॅनची प्रेमकहाणी लग्नाच्या १२ वर्षांनंतरही अजून तेवढीच गोड आणि मजबूत आहे हे कळून येते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.