Maharashtra Live Update : नंदुरबार जिल्ह्यात चिकन पॉक्सचा धोका
Saam TV March 03, 2025 06:45 AM
नंदुरबार जिल्ह्यात चिकन पॉक्सचा धोका,लहान मुलांना लागण

लहान बालकांमध्ये सर्वाधिक चिकन पॉक्सची लागण झालीय. चिकन पॉक्स हा संसर्गजन्य रोग असल्याने अनेक लहान मुलांना त्याची लागण होतेय. ताप येणे, अंगाला पुरळ, फोडनंतर खरुज होण्याचा धोका. लहान मुलांसोबतच वयोवृद्धांना देखील चिकन पॉक्सची लागण झालीय.

उद्धव सेनेच्यावतीने ठाण्यात शक्तिप्रदर्शन

आज उद्धव सेनेच्या वतीने ठाण्यात शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. या मेळाव्यात संजय राऊत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाण्यातील एन. के. टी. कॉलेज या ठिकाणी होणार आहे.

Maharashtra Live Update : स्वारगेट एस टी स्टँड लैंगिक अत्याचार प्रकरणी अपडेट

पुण्यातील स्वारगेट बस स्थानक लैंगिक अत्याचार प्रकरणी ॲड.असीम सरोदे पीडित तरुणीची बाजू न्यायालयात मांडणार

ॲड.असीम सरोदे यांना त्यांची टीम ॲड. श्रीया आवले, ॲड.गीता वाडेकर, ॲड. अरहंत धोत्रे, ॲड. रमेश तारू इत्यादी कायदेविषयक संशोधन व विश्लेषण करून विविध दृष्टीकोन मांडण्यासाठी सहकार्य करणार

असीम सरोदे यांच्याकडून सगळ्या घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू

Pune crime : पुण्यात पुन्हा लैंगिक अत्याचाराची घटना

बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासनारी घटना पुण्यातील नांदेड सिटी परिसरात घडलीय

स्वतःच्या 14 वर्षे मुलीवर नराधम बाप 8 महिने लैंगिक अत्याचार करत होता

आई घराबाहेर गेल्यावर नराधम बाप मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करत होता

याप्रकरणी पुण्यातील नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा

पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तर 45 वर्षीय नराधम बापाला अटक करण्यात आलीय

मंत्री धनंजय मुंडे यांनी कोणत्याही दबावाला बळी पडून राजिनामा देऊ नये, ओबीसी नेते सोमनाथ काशिद यांची आक्रमक भूमिका Beed : बीडच्या धारूर तालुक्यात अफूची शेती, 50 गोण्या अफू पोलिसांकडून जप्त

अफू पीकवण्यावर शासनाने निर्बंध घातले असताना देखील बीडच्या धारूर तालुक्यातील पिंपळवाडा येथे रामहरी कारभारी तिडके या शेतकऱ्याने चक्क बालाघाट पर्वतरांगेतील तीन गुंठे क्षेत्रावर शेततळ्याच्या पाण्यावरच अफूची शेती पिकवल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

याबाबत माहिती मिळताच बीड एलसीबी आणि धारूर पोलिसांनी कार्यवाही करत शेतातील अफू उपटून घेत साधारण 50 गोण्या अफू जप्त केला. धारूर पोलीस याबाबतचा पुढील तपास करत आहेत. नशेखोरांकडून नशा करण्यासाठी अफूचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

Shirdi : शिर्डीच्या साईबाबा हॉस्पिटलला 21 लाखांच्या वैद्यकीय उपकरणांची देणगी

साईबाबा संस्थानच्या रूग्णालयात गुजरात येथील जय साई फांऊडेशनकडून 21 लाख रूपयांच्या आधुनिक मशिन दान देण्यात आल्या आहेत.. या अत्याधुनिक उपकरणांमुळे कार्डिओलॉजी आणि कार्डियाक सर्जरी विभागातील तपासण्या तसेच शस्त्रक्रिया अधिक प्रभावी तंत्रज्ञानाच्या मदतीने करता येणार असून रुग्णांना त्याचा मोठा लाभ होणार आहे...

Crime : तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात राजकीय पार्श्वभूमी असलेला मोरक्या पिंटू मुळे याला अटक

तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात राजकीय पार्श्वभूमी असलेला मोरक्या पिंटू मुळे याला अटक

मुळे याला 13 मार्चपर्यंत सुनावली 12 दिवसाची पोलीस कोठडी

या प्रकरणात सुरवातीला पकडण्यात आलेल्या तीन आरोपींना पोलीस कोठडी संपल्यानंतर आता न्यायालयीन कोठडीत केले रवाना

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात एकूण 12 आरोपी असल्याची पोलिसांची माहिती

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणांमध्ये राजकीय लोकांचे फास आवळले जात असल्याने राजकीय पार्श्वभूमी असलेले किती आरोपी यामध्ये सहभागी असणार याकडे सर्वांचे लक्ष

तुळजापूर मुंबई ड्रग्स कनेक्शनचे मुंबई येथे आणखी आरोपी असल्याची पोलिसांनी वर्तवली शक्यता

Maharashtra Live Update : आरोपी दत्तात्रय गाडेची होणार डीएनए चाचणी

स्वारगेट एस टी स्टँड अत्याचार प्रकरण

आरोपी दत्तात्रय गाडेची होणार डीएनए चाचणी

आरोपीच्या डीएनए चाचणीसाठी रक्त आणि केस फोरेन्सिक लॅबला पाठवले

आरोपीविरोधात पोलिसांना सबळ पुरावे मिळाले आहेत

बसची केली फॉरेन्सिक चाचमी त्यात पोलिसांना पुरावे मिळाले आहेत

ससून रुग्णालयात आरोपीची लैंगिक क्षमता चाचनी करण्यात आली ती पण पॉजिटिव आली आहे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.