तुमची रात्रीची झोप उडाली असेल, वारंवार झोप मोड होत असेल तर रात्रभर गादीवर तळमळत असाल तर याला कारण म्हणजे तुमच्या शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असू शकते. मॅग्नेशियम आपल्या शरीराला न्युरोट्रान्समीटर्स आणि हार्मोन्सना नियंत्रित करण्यास मदत करते. जे झोपेसाठी आवश्यक असते. उदाहरणार्थ…
मेलाटोनिन आणि GABA ( गामा-एमिनोब्यूटिरिक एसिड). हे तत्व नर्व्हस सिस्टमला शांत करुन चांगल्या गाढ झोपला मदत करते. चला तर पाहूयात नेमके कसे ?
मॅग्निशियम चांगल्या झोपेसाठी कशी मदत करते ?
मॅग्निशियम पॅरासिम्पेथेटिक नव्हर्स सिस्टमला एक्टीव्ह करते,जे शरीराला शांत करण्यासाठी काम करते. हे कोर्टिसोल (स्ट्रेस हार्मोन) ला कमी करते. ज्यामुळे पटकन गाढ झोप येते.
मॅग्नीशियमचा पुरसा वापर केल्यास झोपेचा कालावधी वाढत असतो. आणि झोपेची गुणवत्ता आणखीन चांगली होते. वारंवार झोपेतून जागे होण्याची समस्या कमी होते.
मेलाटोनिन एक असे हार्मोन आहे, जे आपल्या स्लीप – वेक सायकलला नियंत्रित करते. मॅग्नीशियम मेलाटोनिनच्या उत्पादनास मदत करते. ज्यामुळे झोपेचा पॅटर्न चांगला होतो.
जर तुम्हाला अनिद्रेची समस्या आहे, झोपण्यात अडचणी येत असतील तर मॅग्नेशियम युक्त आहार घेतल्याने ही समस्या कमी होऊ शकते. झोप न येण्यामागे तुमच्या शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असू शकते.
ड्राय फ्रूट्स आणि नट्स – बादाम, काजू..
बीज (Seeds) – भोपळ्याच्या बिया, सुर्यफूलांच्या बिया
हिरव्या भाज्या – पालक, केळी
अन्न – अख्ख्या डाळी
फळे – केळी
मॅग्नीशियमच्या कमतरतेने जर झोप येत नसेल तर तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय..
अर्ध्या बादली गरम पाण्यात 8 – 10 पाकिट एप्सम सॉल्ट टाका त्याला चांगले ढवळून त्यात आपले पाय बुडवा..
20-25 मिनिटानंतर जेव्हा पाणी थंड होई तेव्हा पाय बाहेर काढा आणि टॉवेलने पुसून झोपायला जा…
जर तुमच्या शरीरात जर मॅग्नेशियमची कमतरता असेल तर हे उपाय तुमच्या कामी येतील.