48762
मुंबई कोकण भजन मंडळ
तालुका अध्यक्षपदी गावडे
ओटवणे, ता. ३ ः अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळाच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी सरमळे येथील ओंकार प्रासादिक भजन मंडळाचे प्रसिद्ध भजनी बुवा संजय गावडे यांची निवड करण्यात आली.
अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळाचे संस्थापक संजय ल. गावडे, अध्यक्ष नारायण वाळवे, सेक्रेटरी प्रमोद टक्के यांनी ही निवड केली. अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळाच्या कार्यकारिणी बैठकीत पाच वर्षांसाठी ही निवड झाली. बुवा संजय गावडे हे विद्यार्थीदशेपासूनच भजन व संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. ते भजनकलेची जोपासना करतानाच भजनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करीत या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक भजन स्पर्धांमध्ये उत्कृष्ट गायक तसेच हार्मोनियम वादक पारितोषिके पटकावली आहेत. डबलबारी क्षेत्रातही गावडे यांनी गेल्या काही वर्षांत आपला चाहता वर्ग निर्माण केला आहे. भजन क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांची अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळाच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.