बाजाराच्या घसरणीत टाटा समुहाचा 'हा' शेअर आला निम्म्यावर; Rekha Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओला कोट्यवधींचा फटका
Tata Motors Stock : शेअर बाजारातील बिग बुल म्हणून ओळखले जाणारे दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओकडे इतर गुंतवणुकदारांचे लक्ष असते. परंतू गेल्या काही महिन्यात शेअर बाजारात झालेल्या घसरणीमध्ये झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओलाही मोठा फटका बसला आहे. गेल्या पाच महिन्यांत टाटा ग्रुपच्या एका शेअरमध्ये त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हा शेअर म्हणजे टाटा मोटर्स होय. ज्याने सोमवारी नवीन नीचांकी पातळी गाठली. टाटा मोटर्सच्या घसरणीमुळे झुनझुनवालांचे १७६० कोटी रुपये अवघ्या पाच महिन्यांत बुडाले आहेत. शेअरची किंमत त्याच्या उच्चांकापासून निम्म्यावरआठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी टाटा मोटर्सचा शेअर ६२०.६५ रुपयांवर उघडला आणि काही वेळातच तो ६०६.३० रुपयांच्या पातळीवर घसरला, जो ५२ आठवड्यांतील त्याचा नवीन नीचांकी स्तर आहे. शेअर्समध्ये घसरण झाल्यामुळे कंपनीचे बाजार भांडवलही २.२९ लाख कोटी रुपयांपर्यंत कमी झाले. अलिकडच्या काळात विक्रीत झालेली घट, घटते मार्जिन आणि कमकुवत तिमाही उत्पन्न यामुळे टाटा समूहाची ही कंपनी सतत विक्रीच्या दबावाचा सामना करत आहे. रेखा झुनझुनवाला यांचे मोठे नुकसानझुनझुनवाला पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या आवडत्या शेअरपैकी टाटा मोटर्सचा शेअर एक आहे. ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत, रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे ४,७७,७०,२६० इक्विटी शेअर्स होते, ज्यामुळे त्या कंपनीच्या १.३० टक्के भागधारक बनल्या. त्यावेळी टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत ९७४.६५ रुपये होती. यानुसार, झुनझुनवालाचे होल्डिंग व्हॅल्यू ४,६५५.९२ कोटी रुपये होते जे सोमवारी ३ मार्च रोजी २,८९५.८३ कोटी रुपयांवर घसरले. म्हणजेच त्यांना फक्त पाच महिन्यांत १,७६० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. किंमत त्याच्या उच्चांकापासून निम्म्यावर टाटा ग्रुपच्या ऑटोमोबाईल कंपनीच्या शेअर्समध्ये सतत होत असलेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची किंमत त्याच्या सर्वकालीन उच्चांकी पातळीपेक्षा जवळजवळ निम्म्यावर आली आहे. गेल्या वर्षी ३० जुलै रोजी टाटा मोटर्सच्या एका शेअरची किंमत १,१७९.०५ रुपयांवर पोहोचली होती आणि त्यानंतरही शेअरमधील घसरण सुरूच असून ती उच्च पातळीपासून ४९ टक्क्यांनी खाली आली आहे. दीर्घकाळात चांगला परतावागेल्या पाच-सहा महिन्यांत टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली असली तरी, दीर्घकाळात गुंतवणूकदारांसाठी तो मल्टीबॅगर परतावा देणारा ठरला आहे. जर आपण आकडेवारी पाहिली तर, ६ मार्च २०२० रोजी एका शेअरची किंमत ११४.२० रुपये होती आणि त्यानुसार, मोठी घसरण असूनही जर आपण सध्याच्या किमतीचा हिशोब केला तर त्याने ४४४.१३ टक्के परतावा दिला आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांचे पैसे पाच वर्षांत पाच पटीने वाढले आहेत.