इंडिया विरूद्ध ऑस्ट्रेलिया सामना कोण जिंकणार? आयआयटी बाबाने पुन्हा वर्तवलं भाकीत
GH News March 04, 2025 07:14 PM

आयआयटी बाबा नावाने प्रसिद्ध असलेल्या अभय सिंह यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. जयपूरमध्ये एका प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे, त्यांनी सोशल मीडियावर आत्महत्येची धमकी दिली होती, याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली, ते जयपूरमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, तिथे पोलीस पोहोचले त्यांनी आयआयटी बाबाची चौकशी केली. आपण जेव्हा असं वक्तव्य केलं तेव्हा आपण गांजाच्या नशेमध्ये होतो, त्यामुळे काय बोललो हे आठवत नाही असं आयआयटी बाबांनी पोलिसांना सांगितलं. तसेच त्यांनी आपल्या जवळ असलेली गांजाची पुडी देखील पोलिसांना काढून दिली, पोलिसांनी गांजा जप्त केला. मात्र हा गांजा केवळ 1.50 ग्रॅमच असल्यामुळे पोलिसांनी गांजा जप्त करून आयआयटीबाबाला समज दिली.

आयआयटीबाबाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यापूर्वी भविष्यवाणी केली होती. हा सामना पाकिस्तानच जिंकेल, विराट कोहलीला म्हणा तू कितीही प्रयत्न कर पण पाकिस्तानच जिंकणार असं भाकित वर्तवलं होतं. मात्र त्या सामन्यात भारताचा विजय झाला, भारताच्या विजयानंतर आयआयटी बाबा चांगलेच ट्रोल झाले. त्यानंतर त्यांनी आता पुन्हा एकदा आज सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि भारत सामन्याबाबत भाकित वर्तवलं आहे.

काय म्हणाले आयआयटी बाबा?

आयआयटी बाबानं भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्याबाबत भविष्यवाणी केली होती. पाकिस्तान जिंकणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र त्यांची ही भविष्यवाणी खोटी ठरली ते चांगलेच ट्रोल झाले. त्यानंतर त्यांना आजच्या सामन्याबाबत विचारण्यात आलं. या सामन्यावर त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. आज ऑस्ट्रेलिया जिंकणार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे, मात्र पुढे ते असंही म्हणाली की बघूयात लाईव्ह सामन्यामध्ये काय होतं ते, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आज इंडिया विरूद्ध ऑस्ट्रेलिया सामना सुरू आहे. हा उपांत्य फेरीचा सामना असून जो संघ हा सामना जिंकेल त्याला फायनलचं तिकीट मिळणार आहे. सर्व जागाचं लक्ष सध्या या सामन्याकडे लागलं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.