SUV घ्यायची आहे का? Volvo xc90 लाँचिंगसाठी सज्ज, फीचर्स, किंमत जाणून घ्या
GH News March 04, 2025 10:14 PM

तुम्ही वाहन घेण्याचा विचार करत आहाता का ? असं असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. युरोपमधील आघाडीची वाहन निर्माता कंपनी Volvo भारतीय बाजारपेठेत अनेक सेगमेंटमध्ये कार आणि एसयूव्ही ऑफर करते. कंपनी नवीन वाहन लाँच करण्याच्या तयारीत आहे. कोणत्या सेगमेंटमध्ये कोणत्या प्रकारच्या फिचर्ससह, नवीन वाहन कधी लाँच केले जाऊ शकते. याविषयी पुढे वाचा.

नवी कार कधी लाँच होणार?

Volvo xc90 5 मार्च 2025 रोजी भारतात नवीन कार लाँच करणार आहे. कंपनीकडून लाँच होणारी गाडी प्रीमियम एसयूव्ही सेगमेंटमध्ये आणली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Volvo xc90 5 मार्च 2025 रोजी भारतीय बाजारात आणला जाऊ शकतो.

जागतिक स्तरावर सादर

कंपनीच्या वतीने ही एसयूव्ही सप्टेंबर 2024 महिन्यात जागतिक स्तरावर सादर करण्यात आली आहे. त्यानंतर आता या एसयूव्हीचे फीचर भारतीय बाजारात आणण्याची तयारी केली जात आहे.

काय बदलणार?

मिळालेल्या माहितीनुसार, एसयूव्हीच्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये एक्सटीरियरसोबतच इंटिरिअरमध्येही अनेक बदल करण्यात येणार असून यात काही नवीन फीचर्सही जोडले जाणार आहेत. एसयूव्हीच्या फेसलिफ्टमध्ये रि डिझाइन केलेले ग्रिल, टी-आकाराचे एलईडी डीआरएल, नवीन हेडलाइट्स देण्यात येणार आहेत. याशिवाय साइड आणि रिअर प्रोफाईलमध्ये फारसा बदल होण्याची शक्यता कमी आहे. इंटिरियरमध्ये मोठी इन्फोटेनमेंट सिस्टिम, फोर झोन ऑटो एसी, पॅनोरॅमिक सनरूफ आणि बरेच काही मिळण्याची शक्यता आहे.

इंजिन किती शक्तिशाली असेल?

Volvo xc90 एसयूव्हीमध्ये कंपनीचे दोन लीटर टर्बोचार्ज्ड इंजिन असेल. ज्याच्या मदतीने 48V माइल्ड हायब्रिड किंवा प्लग-इन हायब्रिड तंत्रज्ञान दिले जाऊ शकते. माइल्ड-हायब्रिड इंजिनसह हे इंजिन 250 पीएस पॉवर आणि 360 एनएम टॉर्क जनरेट करू शकते. प्लग-इन टेक्नॉलॉजीसह ही एसयूव्ही 455 पीएस पॉवर आणि 709 एनएम टॉर्क जनरेट करेल. या एसयूव्हीमध्ये 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि ऑल व्हील ड्राइव्ह (एडब्ल्यूडी) असेल.

कधी लाँच होणार?

Volvo xc90 चा फेसलिफ्ट भारतीय बाजारात लाँच करण्यात येणार आहे. लाँचिंगच्या वेळी याची एक्स शोरूम किंमत एक कोटी रुपयांच्या आसपास असू शकते. बाजारात त्याची टक्कर मर्सिडीज बेंझ जीएलई, बीएमडब्ल्यू एक्स 5, ऑडी क्यू 7 आणि लेक्सस आरएक्स सारख्या एसयूव्हीशी होणार आहे.

आम्ही तुम्हाला Volvo xc90 याविषयी सर्व माहिती दिली आहे. आता तुम्ही तुमच्या गरजेनुसार ही कार घेण्याचा विचार करू शकता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.