Pune Fire: पुण्यात इलेक्ट्रिक बाईकच्या कंपनीला भीषण आग, २००० दुचांकीचे साहित्य जळून कोळसा
Saam TV March 05, 2025 12:45 AM

पुणे: कात्रज-गुजारवाडी रोड येथील साई इंडस्ट्रियल एरिया मधील भूषण एंटरप्रायझेस या इलेक्ट्रिक बाईक बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग संध्याकाळी ४ वाजून ८ मिनिटांनी लागल्याची प्राथमिक माहिती आहे. गंगाधाम, कात्रज, कोंढवा बुद्रुक येथून दहा अग्निशमन बंब आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दाखल झाले.

या आगीत १५० अर्धवट तयार दुचाकी जळून खाक झाल्या असून, २,००० दुचाकीचे साहित्यही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.

नाशिक येथील फर्निचरच्या गोदाममध्ये भीषण आग

इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळील साईनाथ नगर येथील डी एम फर्निचर च्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत लाखो रुपयांचे फर्निचर जळून खाक झाले. आगीचा भडका इतका तीव्र होता की बाजूच्या गॅरेजपर्यंत पोहोचला आणि त्यामध्ये असलेल्या काही वाहनांचेही नुकसान झाले.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एकूण सहा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीमुळे परिसरात मोठी गर्दी झाली असून, अग्निशमन दलाने नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.