महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन शिक्षण समूहात (Sant Gajanan Education Group) आयोजित ‘एक्सप्लोर २०२५’ या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.
महागाव : ‘आपण मोठ्या शहरांपासून लांब आहोत, असा न्यूनगंड ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी बाळगू नये. कारण मी सुद्धा ग्रामीण भागातूनच आलेली आहे. जेवढे आपण मातीशी जोडलेले असतो, तेवढे जास्त खंबीर, चिवट, जिद्दी असतो. त्यामुळे ‘तुम्ही ठरवलंत तर जग जिंकू शकता’,’ असा आत्मविश्वास प्रसिद्ध मराठी अभिनेत्री(Marathi actress Prajakta Mali) हिने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिला.
महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन शिक्षण समूहात (Sant Gajanan Education Group) आयोजित ‘एक्सप्लोर २०२५’ या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थापक ॲड. अण्णासाहेब चव्हाण होते. गडहिंग्लजचे तहसीलदार ऋषिकेत शेळके व मान्यवरांच्या हस्ते कलाविष्कार कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
‘घुंगराच्या बोलांनी’ या मराठमोळ्या दिलखेचक लावणीने कलाविष्काराला प्रारंभ झाला. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनीनी एकापेक्षा एक नृत्य, गायन, काव्यरचना, एकपात्री नाट्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना माळी म्हणाल्या, ‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना केवळ शालेय शिक्षणातच गुरफटून न ठेवता व्यक्तिमत्त्व विकास, करिअरसाठी राबविले जाणारे उपक्रम फारच चांगले आहेत. विद्यार्थी शालेय शिक्षण खूप चांगले घेतात. मात्र, जेव्हा बोलण्याची, ऑडिशनची वेळ येते, तेव्हा आपली मुले कमी पडतात. ही उणीव भरून काढण्यासाठी संत गजानन शिक्षण समूह सतत विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये धाडस निर्माण करत आहे.’
कार्यक्रमास पोलिस निरीक्षक अजय सिंदकर, उपनिरीक्षक विजय घाटगे, डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, डॉ. प्रतिभा चव्हाण, डॉ. सुरेखा चव्हाण, ॲड. बाळासाहेब चव्हाण, आगारप्रमुख गुरुनाथ रणे, बाळकू शिंदे, शशिकांत पाटील-चुयेकर, तेजस्विनी पाटील-चुयेकर. यांच्यासह प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. मुख्य नियोजक म्हणून प्रा. अमरसिंह फराकटे, डॉ. अजिंक्य चव्हाण, प्रा. शिरीष गणाचारी, प्रा. केतन प्रसादी, प्रा. प्रीती पाटील, प्रा. अचला नारायणकर, प्रा. स्वप्नील हराळे, प्रा. जंगली यांनी काम पाहिले. प्रा. कल्याणी चव्हाण यांनी आभार मानले.