चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना मंगळवारी (४ मार्च) भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळवला जात आहे. दुबईला होत असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने २५० धावांचा टप्पा ओलांडण्यात यश मिळवलं आहे. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी २६५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
दोन्ही संघांनी आत्तापर्यंत दोनदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे, त्यामुळे आता ते हा सामना जिंकून तिसऱ्या विजेतेपदाकडे महत्त्वाचे पाऊल टाकण्यात उत्सुक असतील. तसेच भारताने गेल्या दोन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अंतिम सामना खेळला आहे. त्यामुळे आता भारतीय संघ सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करताना दिसेल.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी शेवटपर्यंत चांगली झुंज दिली. त्यांच्याकडून कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि यष्टीरक्षक फलंदाज ऍलेक्स कॅरेने अर्धशतके साकारली.
(बातमी अपडेट होत आहे)