मुख्यमंत्री पारदर्शक कारभार करत असतील तर त्यांचे स्वागत आहे. मात्र हे काम करत असताना त्यांचे हात कोणी बांधतय का, असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर बोलताना ठाकरे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.
ते म्हणाले, ‘संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो, व्हिडिओ पुढे आले आहेत. हे सरकारकडे आधी आले नव्हते का? मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता एकेक विषय पुढे येत आहेत. मुख्यमंत्री जर पारदर्शक कारभार करत असतील, तर त्यांचे स्वागत आहे.
मात्र पारदर्शी कारभार करत असताना त्यांचा हात कोणी बांधतेय का, असा सवाल उपस्थित करत, एकमेकांच्या व्यथेला पांघरूण घालणारे सरकार राज्याला नकोय,’ असे भूमिका ठाकरे यांनी मांडली.
ते म्हणाले, ‘मुंडे यांच्या राजीनाम्याचे नेमके कारण काय आहे? त्यांनी तब्येतीचे कारण पुढे केले आहे तर नैतिकतेच्या आधारावर मुंडे यांनी राजीनामा दिल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे,’ याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात मुली, महिलांवर अत्याचार होत आहे. त्यामुळे केवळ मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन चालणार नाही. तर संपूर्ण सरकारच बरखास्त केले पाहिजे.
- आदित्य ठाकरे, आमदार