राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुपारी साडेबारा वाजता विधानभवनात ही बैठक होईल. धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा आणि माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळाल्यानंतक मंत्रिमंडळाची आज पहिलीच बैठक होत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार याकडे बघणं महत्त्वाचं असेल.
Sanjay Raut live:हा महाराष्ट्राचा अपमान नाही का?भैय्याची जोशी यांचे मराठी भाषेविषयी केलेले विधान हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईची भाषा ही मराठी नाही, असे विधान भैय्याची जोशी यांनी केले आहे. त्यावर राऊत यांनी संताप व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धिक्कार करणार का? असा खडा सवाल राऊतांनी केला आहे.
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी बुलढाण्यात सर्व पक्षीय धरणे आंदोलनसरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो समोर आल्यानंतर आता संतापाची लाट राज्यभर उसळली आहे. याप्रकरणी आज (ता.6) बुलढाण्यात सर्व पक्षीय धरणे आंदोलनं करण्यात आले आहे. वालमिक कराडसह सर्व आरोपीना फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आलीय. तसेच धनंजय मुंढेंची देखील सीआयडीने सखोल चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आलीय.
Jaykumar Gore News : मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून अखेर हक्कभंग दाखलमहिलेला फोटो पाठवल्याच्या आरोपानंतर मंत्री जयकुमार गोरे यांनी काल (ता.5) विधीमंडळाबाहेर स्पष्टीकरण दिले होते. तसेच मला न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. पण आता काही लोक मला बदनाम करत असत आहेत. यामुळे आता त्यांचाविरोधात हक्कभंग दाखल करणार असल्याचा इशारा दिला होता. तो आता त्यांनी दाखल केला आहे. जयकुमार गोरे यांच्याकडून संजय राऊत, रोहित पवार आणि लयभारी युट्यूब चॅनल विरोधात हक्कभंग दाखल करण्यात आला आहे.
Ajit Pawar News : मुंडेंच्या कारभार अजितदादांच्या हातातबीड हत्याकांडामुळे अडचणी आलेल्या मंत्री धनंजय मुंडेंना आपला राजीनामा द्यावा लागला आहे. यामुळे त्यांच्या जागी आता नवा चेहरा कोण? कोणाला संधी मिळणार अशा चर्चा सुरू झाल्या असतानाच मुंडेंच्या खात्याचा कारभार अजित पवारांनी आपल्याकडे घेतला आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचा कारभार आपल्याकडे घेतला आहे.
MVA Kolhapur News : कोल्हापूरमध्ये फडणवीस येण्याआधीच मविआच्या नेत्यांची धरपकडमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर असून प्रशांत कोरटकरवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. कोल्हापुरात याच मागणीसाठी आंदोलन करण्याचा इशारा मविआच्या नेत्यांनी दिला होता. पण आता फडणवीस येण्याआधीच मविआच्या नेत्यांची धरपकड पोलिसांकडून केली जातेय.
Rahul Gandhi News : राहुल गांधी आज मुंबईतधारावी पुनर्वसन प्रकल्पावरून सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, आता काँग्रेस नेते राहुल गांधी येथे भेट देणार आहेत. आज ते मुंबईत येणार असून धारावीला भेट देतील.
MVA NEWS : महाविकास आघाडीच्या आमदारांची आज बैठकविधीमंडळाचे अधिवेशन सुरू झाले असून विरोधकांनी सरकारला गेल्या तीन दिवसात विविध मुद्द्यावरून घेरलं आहे. अशातच महाविकास आघाडीच्या आमदारांची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. ही बैठक शरद पवार, उद्धव ठाकरे आणि विजय वड्डेटीवर यांच्या उपस्थितीत होणार असून सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर ही बैठक सायंकाळी 4 वाजता वाय बी चव्हाण सेंटर येथे बैठक होणार आहे.
Manikrao Kokate News : कोकाटेंवरही राजीनाम्यासाठी दबाव वाढणार?अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका लाटल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा झालेले कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्यावरही राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे. न्यायालयाने त्यांच्या शिक्षेस स्थगिती दिली असलीतरीही त्यांच्यावर आरोप सिद्ध झाला आहे. यामुळे विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची आज लावून धरली जाऊ शकते.
Maharashtra Budget Session News : आजच्या चौथ्या दिवशीही विधीमंडळाचे तापमान वाढणारराज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च 2025 रोजी सुरू झाले असून ते 26 मार्च रोजी संपणार आहे. 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्च रोजी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार सादर करतील. पण आजच्या चौथ्या दिवशीही . अबू आझमी निलंबन आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.