आदित्य बादेकर यांचा आस्था ग्रुपतर्फे सत्कार
esakal March 07, 2025 02:45 AM

swt614.jpg
49538
मालवणः छावा चित्रपटाचा व्हीएफएक्स निर्माता आदित्य बादेकर यांचा आस्था ग्रुपच्यावतीने सत्कार करण्यात आला.

आदित्य बादेकर यांचा
आस्था ग्रुपतर्फे सत्कार
मालवण, ता. ६ः छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावरील ‘छावा’ सिनेमात व्हिएफएक्स निर्माता म्हणून काम केलेले मालवणचे सुपुत्र आदित्य बादेकर यांचा मालवण रेवतळे येथील निवासस्थानी आस्था ग्रुपच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी छावा चित्रपटाची निर्मीती कशाप्रकारे आव्हानात्मक होती, आणि सिनेमा बनविताना आलेले अनुभव आणि शिवप्रेमींकडून मिळालेले सहकार्य याबाबतची माहिती दिली.
आस्था ग्रुपच्यावतीने संस्थेचे अध्यक्ष उमेश मांजरेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खजीनदार बंटी केनवडेकर, सचिव मनोज चव्हाण, सौगंधराज बादेकर, भाऊ सामंत, श्रीराज बादेकर, निनाद बादेकर, भुषण मेथर आदी उपस्थित होते. मालवणच्या नावलौकीकात आदित्य बादेकर याने महत्वपूर्ण योगदान दिलेले असून येथील युवकांनाही या नविन क्षेत्रात करियर करण्याची संधी यानिमित्ताने मिळणार असल्याचे आस्था ग्रुपचे अध्यक्ष मांजरेकर यांनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.