सोन्याच्या तस्करी प्रकरणी कन्नड अभिनेत्री रान्या राव हीला बंगळुरु विमानतळावर अटक करण्यात आली आहे.
तिच्याकडून 14 किलो सोनं,2.67 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
कर्नाटक केडरचे IPS अधिकारी रामचंद्र राव यांची ती सावत्र मुलगी आहे. रामचंद्र राव डीजीपी दर्जाचे अधिकारी आहेत.
'माणिक्य'चित्रपटात कन्नड सुपरस्टार सुदीप याच्यासोबत तिनं काम केले होते. त्यानंतर ती चर्चत आली होती.
अनेक दक्षिणात्य चित्रपटात तिनं केलेल्या भूमिकांचे सिनेरसिकांनी कौतुक केले आहे.
रान्या गेल्या वर्षभरात 30 वेळा दुबई येथे गेली होती.
तस्करी करुन आणलेले एक किलो सोने विकल्यावर तिला 1 लाख रुपये मिळत होते.
एका दुबई दौऱ्यात तिला सुमारे 13 लाख रुपये मिळायचे.
सोने तस्कर करण्यासाठी ती खास जॅकेट आणि बेल्टचा उपयोग करीत असे