ग्रामीण शाळा म्हणजे संस्काराचे केंद्र
esakal March 07, 2025 02:45 AM

swt612.jpg
49529
मातोंड ः शाळा क्र. १ च्या १२० व्या वर्धापनदिन निमित्त विद्यार्थ्यांना केक भरवताना जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व इतर मान्यवर.

ग्रामीण शाळा म्हणजे संस्काराचे केंद्र
मनीष दळवीः मातोंड रवळनाथ विद्यामंदिरचा वर्धापन दिन
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ६ः शाळा हा शिक्षणाचा पाया असतो. ग्रामीण शाळांमधून शिक्षण घेतलेली मुले पुढे संस्कारक्षम बनतात. मातोंड येथील शाळा क्र. ला आज १२० वर्षे पूर्ण झाली. या शाळेने हजारो विद्यार्थी घडविले आहेत. शाळेच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी मदत करण्यास मी कटिबद्ध आहे. वरिष्ठ स्तरावरून शाळेच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी मातोंड येथे दिली.
मातोंड येथील श्री देव रवळनाथ विद्यामंदिर शाळा क्र. १ ला १२० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या शाळेचा वर्धापन दिन सोहळा थाटात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी बोलत होते. यावेळी मातोंड उपसरपंच आनंद परब, ग्रामपंचायत सदस्य राहुल प्रभू, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आनंद मातोंडकर, सामाजिक कार्यकर्ते बाळा मोहिते, शिक्षक पालक संघ अध्यक्ष देवदास परब, पालक सदस्य रामा नेमण, माजी अध्यक्ष सत्यवान गवंडे, विठ्ठल गवंडे व माजी विद्यार्थी उपस्थित होते.
वर्धापन दिनानिमित्त शाळेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेमध्ये घेण्यात आलेला विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मुलांच्या उपस्थितीत केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर भास्कर वैद्य पुरस्कृत जय संतोषी माता नाट्यमंडळ पेंडूर यांचा ''कृष्ण कवच'' हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपेश परब यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी मुख्याध्यापक अलका कांबळे यांच्यासहित सर्व पालकवर्ग, शाळा व्यवस्थापन समिती यांनी परिश्रम घेतले. माजी विद्यार्थ्यांचे या कार्यक्रमासाठी मोठे योगदान लाभले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.