चिमणी पाखर डान्स अकॅडमीतर्फे कुडाळात १५ ला नृत्य सन्मान सोहळा
esakal March 07, 2025 02:45 AM

49512
49513
49514

कुडाळात १५ ला
नृत्य सन्मान सोहळा
‘चिमणी पाखर डान्स’तर्फे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ६ ः चिमणी पाखर डान्स अकॅडमी कुडाळचा नृत्य सन्मान सोहळा १५ ला येथील मराठा समाज हॉलमध्ये सायंकाळी पाच वाजता होणार आहे. यावर्षी जिल्ह्यातील विविध कलाकारांच्या सन्मानासह जीवनगौरव पुरस्काराने सिने नाट्य दिग्दर्शक, लेखक निलेश उर्फ बंड्या जोशी तर विशेष कर्तुत्व पुरस्कार कथ्थक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत यांना जाहीर केला आहे. या सोहळ्यासाठी प्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती चिमणी पाखर डान्स अकॅडमीचे सल्लागार सुनील भोगटे व अध्यक्ष रवी कुडाळकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी सतीश पावसकर, निखिल कुडाळकर, संजना पवार आदी उपस्थित होते. सन्मान सोहळ्याचे दुसरे वर्ष असून येथील कलावंतांना व्यासपीठावर मिळावे, त्यांच्या कलेचा सन्मान व्हावा हा दूरदृष्टीकोन ठेवून हा सन्मान सोहळा केला जात आहे. यावेळी जिल्ह्यातील ८० कलाकारांचा सन्मान होणार आहे. जिल्ह्यातील नृत्यांगना दीक्षा नाईक हिची आशिष पाटील यांच्या सेलिब्रिटी कलाकाराच्या सुंदरी या डान्स शोमध्ये निवड झाल्याबद्दल तिचा सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ ला जिल्ह्यातील नृत्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नृत्यांगनासाठी एक दिवसाचे नृत्य प्रशिक्षण हॉटेल लेमनग्रास येथील सभागृहात आयोजित केले आहे. नृत्य कलावंतांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.