Kolhapur News – पन्हाळ्यावर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आढळला साप
Marathi March 07, 2025 03:24 AM

ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावर “पन्हाळगडचा रणसंग्राम, पन्हाळ गडावरून सुटका” लघुपट व 13 डी थिएटरचा शुभारंभ सायंकाळी उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबीटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. तत्पुर्वीच काही वेळेपूर्वी कार्यक्रमाच्या ठिकाणी साप आढळल्याने काही काळ खळबळ उडाली.

पन्हाळगड हे विविध प्रजातींच्या सापांचे स्थान असतानाही, यावेळी प्रशासनाकडून सर्पमित्रांची व्यवस्था केली नसल्याचा गलथान कारभार दिसून आले. कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या एक सर्प मित्रांने साप पकडून तो वनअधिकाऱ्याकडे सुपूर्द केल्याचे सांगण्यात आले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.