भिवंडी (वार्ताहर)ः महापालिका क्षेत्रातील एका आठमजली बेकायदा इमारतीविरोधात प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांनी तक्रार दिली आहे. याप्रकरणी शांतिनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. निजामपुरा येथील भूखंड क्रमांक पाचवर मालमत्ता क्रमांक ५१०/०, बाळा कम्पाउंड या ठिकाणी तळ अधिक आठ मजल्यांचे बांधकाम केले आहे. या प्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६चे कलम ५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.