'छावा' (Chhaava ) चित्रपटातील विकी कौशलच्या अभिनयाचे चाहते दिवाने झाले आहेत. त्याचा अभिनयाचे चित्रपटाला चार चाँद लागले आहे. तर दुसरीकडे चित्रपटात महाराणी येसूबाईची भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना झळकली आहे. 'छावा' (Chhaava) चित्रपट 14 फेब्रुवारीला रिलीज झाला आहे.
'छावा' चित्रपट 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला असून फक्त तीन दिवसांत चित्रपटाने बजेट वसूल केले आहे. 'छावा' चित्रपटातून उतेकर यांनी छत्रपती महाराजांची शौर्यगाथा दाखवण्यात आली आहे.
'छावा' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 20'' पहिला दिवस 33.1 कोटी रुपये
दुसरा दिवस - 39.3 कोटी रुपये
तिसरा दिवस 48.5 कोटी रुपये
चौथा दिवस 24 कोटी रुपये
पाचवा दिवस - 24.50 कोटी रुपये
सहावा दिवस - 32 कोटी रुपये
सातवा दिवस 21.5 कोटी रुपये
आठवा दिवस 23 कोटी रुपये
नववा दिवस - 45 कोटी रुपये
दहावा दिवस - 40 कोटी रुपये
अकरावा दिवस - 19.10 कोटी रुपये
बारावा दिवस - 18.5 कोटी रुपये
तेरावा दिवस - 21.75 कोटी रुपये
चौदावा दिवस- 12 कोटी रुपये
पंधरावा दिवस - 400 कोटींचा टप्पा पार
सोळावा दिवस - 21 कोटी रुपये
सतरावा दिवस - 25 कोटी रुपये
अठरावा दिवस - 8.50 कोटी रुपये
एकोणिसावा दिवस - 5.50 कोटी रुपये
विसावा दिवस - 5.75 कोटी रुपये
एकवीस दिवस - 5.53 कोटी रुपये
एकूण - 483.58 कोटी रुपये
'छावा' ने जगभरात 600 कोटींचा टप्पा पार केला असून बॉक्स ऑफिसवर 'छावा' लवकरच 500 कोटींचा टप्पा पार करणार आहे.'छावा'ला 500 कोटी पूर्ण करण्यासाठी आता फक्त 17 कोटी पाहिजे आहेत. 'छावा'ने रिलीजच्या 21व्या दिवशी 5.53 कोटींची कमाई करून पद्मावत आणि जवानचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
कलेक्शन किती?मीडिया रिपोर्टनुसार, दीपिका पदुकोणच्या 'पद्मावत' चित्रपटाने 21व्या दिवशी 4.50 कोटी रुपये कमावले तर शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाने 5.15 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.