बाजार बंद झाल्यानंतर संरक्षण कंपनीला मिळाली ५७७ कोटींची ऑर्डर; शेअर्सवर असेल गुंतवणूकदारांचे लक्ष
ET Marathi March 07, 2025 02:45 PM
Defence Stock In Focus : बाजारात शेअर्सवर होणाऱ्या हालचालींमागे संबधीत कंपनीबाबतच्या घडामोडी असतात. या आधारे गुंतवणूकदार शेअर्सची खरेदी विक्री करीत असतात. आज नवरत्न दर्जाची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्सचे शेअर्स फोकसमध्ये राहू शकतात. गुरूवारी (७ मार्च) बाजार बंद झाल्यानंतर नवरत्न डिफेन्स पीएसयू भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) बद्दल एक मोठी अपडेट आली आहे. कंपनीने तिच्या नियामक फाइलिंगमध्ये म्हटले की तिला ५७७ कोटी रुपयांचे नवीन ऑर्डर मिळाले आहेत. हे ऑर्डर २० फेब्रुवारी २०२५ नंतर मिळाले आहेत, जेव्हा कंपनीने शेवटचे ऑर्डरबद्दल माहिती दिली होती. गुरुवारी व्यापार सत्रादरम्यान नवरत्न डिफेन्स पीएसयूचा शेअर किंचित घसरणीसह बंद झाला. ऑर्डरमध्ये संरक्षण उपकरणांचा सामावेशशेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ला मिळालेल्या नवीन ऑर्डरमध्ये विविध प्रकारच्या संरक्षण उपकरणांचा समावेश आहे. एअरबोर्न इलेक्ट्रॉनिक युद्ध उत्पादने ही विमानात बसवलेली उपकरणे आहेत आणि शत्रूच्या रडार आणि संप्रेषण प्रणालींना ठप्प करण्यासाठी किंवा फसवण्यासाठी वापरली जातात. कंपनी पाणबुड्यांसाठी डिझाइन केलेली एक विशेष प्रकारची संप्रेषण प्रणाली विकसित करत आहे जेणेकरून त्या पाण्याखाली सुरक्षितपणे संवाद साधू शकतील. बीईएलला आतापर्यंत एकूण १३७२४ कोटी रुपयांच्या ऑर्डरबीईएल डॉप्लर हवामान रडार तयार करेल. हे रडार पाऊस, वादळ आणि वाऱ्याच्या वेगाबद्दल अचूक हवामान माहिती देण्यास सक्षम असेल. याशिवाय ते एक ट्रेन कम्युनिकेशन सिस्टम देखील तयार करेल, जी ट्रेन आणि ट्रेन कंट्रोल रूममधील संवादासाठी एक प्रणाली आहे. या नवीन ऑर्डर्ससह BEL ला या आर्थिक वर्षात आतापर्यंत एकूण १३,७२४ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. बीईएल संरक्षण मंत्रालयासाठी काम करते आणि लष्कर, नौदल आणि हवाई दलासाठी आवश्यक असलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे तयार करते. शेअर्सची बाजारातील कामगिरीगुरुवारी ट्रेडिंग सत्रादरम्यान बीएसईवर बीईएलचा शेअर ०.७३ टक्के किंवा दोन अंकांनी घसरून २७२.८० रुपयांवर बंद झाला. एनएसई वर हा शेअर ०.८८ टक्के किंवा २.४२ अंकांच्या घसरणीसह २७२.५० रुपयांवर बंद झाला. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ३४०.५० रुपये असून ५२ आठवड्यांचा नीचांक १७९.१० रुपये आहे. गेल्या सहा महिन्यांत कंपनीचे भांडवल ३.९१ टक्क्यांनी घसरले असून गेल्या एका वर्षात शेअरने २९.४८ टक्क्यांचा परतावा दिला आहे. कंपनीचे बाजार भांडवल १.९९ लाख कोटी रुपये आहे.