Pune crime news : पुण्यात भररस्त्यात आणि भरदिवसा लघुशंका करून त्यानंतर स्थानिकांच्या नागरिकांना न जुमानता, अश्लील कृत्य करून नंतर आलिशान कारमधून पसार झालेला गौरव आहुजा अखेर पोलिसांना सापडला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
मात्र पोलिसांच्या ताब्यात येण्याआधी त्याने एक माफी मागतानाचा स्वत:चा व्हिडिओ सोशल केला आहे. ज्यामध्ये तो म्हणतोय की, ‘’मी गौरव आहुजा रा. पुणे. काल माझ्याकडून सार्वजनिक ठिकाणी एक कृत्य घडलं होतं, ते खूप चुकीचं होतं. मी मनापासून माफी मागतो. संपूर्ण जनता, पोलीस विभाग व शिंदे साहेबांची माफी मागतो आहे. मला माफ करा आणि मला एक संधी द्या. सॉरी..’’
शिवाय त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या मित्राला याआधीच अटक करण्यात आलेली आहे. आता गौरवला देखील पुण्यात आणलं जाणार आहे आणि उद्या त्याची वैद्यकीय तपासणी करून न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. या निमित्त गौरव आहुजा आणि त्याचे वडील यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पुन्हा एकदा उघड झाली आहे.
या गौरव आहुजाची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. तो अतिशय कृत्यांमध्ये समाविष्ट आहे. त्याचे वडीलही विविध गुन्हेगारी कृत्यांशी निगडीत आहेत. या गौरववर जुगाराचा, खंडणीचा गुन्हा दाखल आहे.
पुण्यातील नामचीन गुंड सचिन पोटे याच्या गँगसोबत हा गौरव असतो. त्याला याआधी २०२१मध्ये अटक झाली होती. क्रिकेट सामन्यांवर तो त्याच्या सहकऱ्यांसह सट्टेबाजी करायचा. महाविद्यालयीन तरुणांना जुगारात अडकवून त्यांना कर्जबाजारी करून मग त्यांना ब्लॅकमेल केलं जायचं.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)