घोडेगाव, ता. ९ : ‘‘महिलांमध्ये कर्तृत्व सिद्ध करण्याची क्षमता आहे. फक्त त्यांची जाणीव देणे गरजेचे आहे आणि तेच काम येथे यशवर्धिनीने केले आहे,’’. असे प्रतिपादन माजी प्राचार्य इंद्रजित जाधव यांनी केले.
आमोंडी (ता आंबेगाव) येथे यशवर्धिनी ग्रामीण महिला स्वयं सिद्ध संघ आंबेगाव (घोडेगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्नशील महिला स्वयंसहाय्यता विभाग आमोंडी यांच्या माध्यमातून जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जाधव बोलत होते. यावेळी आंबेगाव तालुक्यातील बचत गटांतील सुमारे ७५० महिला उपस्थितीत होत्या. यावेळी गडदूदेवी महिला स्वयंसहाय्यता विभागातील पारंपरिक ढोल लेझीम महिला पथकाच्या कलाविष्कारांतून शिवारफेरी काढली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार घोलप, संघाच्या अध्यक्षा योगिता बोऱ्हाडे, सचिव अलका घोडेकर, अलका डोंगरे, शांता थोरात, चंद्रकला भास्कर खजिनदार सविता मुंढे, ललिता वर्पे, अलका डोंगरे, संघाच्या लेखापाल कल्पना एरंडे, अॅड. सारिका भालेराव, सुहास वाघ हरिभाऊ गेंगजे, शिवाजी शेटे, सविता मुंढे, सुरेखा लोहकरे, यशोदा कोढवळे आदी उपस्थित होत्या.
दरम्यान, घोडेगाव बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष अॅड अनिता पाटील यांनी महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रद्धा फलके, शिल्पा फलके, साधना फलके, धनंजय फलके, माधुरी दरेकर यांनी परिश्रम घेतले. भीमाशंकर आयुर्वेदिक हॉस्पिटल वडगाव यांचे सर्व रोगनिदान शिबिरामध्ये महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान साधना दरेकर यांनी भूषविले तर रूपाली फलके यांनी प्रस्तावना तर अलका उंडे यांनी सूत्रसंचालन केले.
03778