rat९p४.jpg
५००९८
काजू बीवर झालेला बुरशीचा प्रादुर्भाव.
rat९p५.jpg
५००९९
किडीचा प्रादुर्भाव होवून झाडाची सुकलेली पाने.
rat९p६.jpg-
५०१००
कीडीने पोखरलेली ओली काजू बी.
rat९p७.jpg-
५०१०१
परिपक्व झालेले काजू बोंड.
rat९p८.jpg, rat९p९.jpg-
५०१०२
राजापूरः करपून काळा पडलेला मोहोर.
rat९p१०.jpg
N५००९१
खोंडकिडा लागलेली काजूच्या झाडाचा बुंधा आणि बाजूला खोंडकिडा अळी.
rat९p११.jpg-
५००९२
राजापूर ः खोंडकिडा लागलेले झाड
rat९p१५.jpg, - rat९p१६.jpg-
५०१०६
काजूची बाग
इंट्रो.....
कोकणातील ‘पांढरं सोनं’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काजू पिकाला सातत्याने विविध नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. गेल्या पाच वर्षामध्ये अवेळी पडणारा पाऊस, तापमान वाढ यांसह टी मॉस्किटो, फळ पोखरणारी अळी आणि खोंडकिडा यांसारख्या किडरोगांच्या प्रादुर्भाव आदींचा सामना करावा लागत आहे. किडरोगांवर उपाययोजना करणे शक्य आहे. मात्र, प्रतिकूल हवामान आणि वाढत्या तापमानावर काय करायचं? असा गहन प्रश्न शेतकरी अन् काजू बागायतदारांसमोर ठाकला आहे. त्यातून, बिघडणाऱ्या जमा-खर्चाचा ताळमेळ बसविण्यासाठी धडपडत असताना हापूस आंब्यासोबत हमखास पैका (उत्पन्न) मिळवून देणारं हे पिक कसं संरक्षित करायचं? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर ठाकला आहे.
- राजेंद्र बाईत, राजापूर
-------------
कोकणच्या पांढऱ्या सोन्याला
विविध समस्यांची काजळी
काजू उत्पादक संकटात; तापमान वाढीने उत्पादन घटले, खर्चात वाढ
काजू पिकाच्या वाढीसाठी सर्वसाधारणतः ३० ते ३५ अंश तापमान पोषक ठरते. मात्र, गेल्या पाच वर्षामध्ये सरासरी ३७ ते ३९ अंश तापमान जात आहे. त्याचा कोवळ्या काजू बीवर प्रतिकूल परिणाम होवून बीची अपेक्षित वाढ होत नाही. त्यातून, काजूबीचा आकार आणि वजन कमी होते. तसेच, वाढत्या तापमानामध्ये थ्रीप्स (फुलकीडी) चा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मोहर चांगला येवूनसुद्धा त्याचा फळधारणेवर प्रतिकूल परिणाम होवून चांगली फळधारणा होत नाही.
किडींच्या प्रादुर्भावामुळे पोकळ बी
काजू पिकावर टी मॉस्किटो आणि फळ पोखरणारी अळी याचा गेल्या काही वर्षामध्ये प्रादुर्भाव वाढला आहे. टी मॉस्किटोचा प्रादुर्भाव नवी येणारी पालवी आणि मोहर याच्यावर ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये मोठ्याप्रमाणावर होतो. त्यामुळे झाडाची पाने आणि आलेला मोहर सुकून जाऊन त्याचा उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होतो. फळ पोखरणारी अळी ही काजू आणि बोंडे तयार होताना त्यांना पोखरून काजुचा गर खाते. परिणामी पोकळ काजू बी तयार होते. त्याचा फटका शेतकरी तसेच, प्रक्रियाधारकांना बसून त्यांचे पोकळ काजू बियांमुळे मोठ्याप्रमाणात नुकसान होते. थ्रीप्स या रस शोषक किडीमुळे काजू अकाली पिकू लागला आहे. त्याचवेळी, थ्रीप्स ही कीड कलम काजूवरच मोठ्याप्रमाणावर येत असल्यामुळे त्याचा कलमी काजूच्या चवीवर प्रतिकूल परिणाम होवून काजूची चव कमी होत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.
अवकाळी पावसाने खोंडकिडा बळावला
खोंड किडा या किडीचा आंबा कलमांप्रमाणे काजूच्या झाडांवरही मोठ्याप्रमाणात प्रादुर्भाव दिसत आहे. आंब्याच्या तुलनेमध्ये काजूवर खोंडकिड्याचा जादा प्रादुर्भाव दिसत आहे. झाडाला खोंडकिड्याचा प्रादुर्भाव झाल्याचे झाडाच्या अंतिम टप्प्यामध्ये समजते. मात्र, त्यावेळी योग्य त्या उपायोजना झाल्यास झाड जगते. मात्र, अनेकवेळा उपायोजना करूनही दहा-पंधरा वर्ष मोठ्या कष्टाने वाढविलेले झाड मरून शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होवून शेतकरी पुन्हा एकदा दहा-पंधरा वर्ष प्रगतीच्यादृष्टीने मागे सारला जातो. अवकाळी वा अवेळी पडणाऱ्या पावसामुळे खोंडकिड्याला बळ मिळत असून गेल्या सुमारे दहा वर्षांमध्ये खोंडकिड्याचा प्रादुर्भाव वाढल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.
उत्पादन निम्म्यावर, खर्चात वाढ
सातत्याने कमी-जास्त होणारे तर कधी वाढणारे तापमान, सातत्याने किडीचा प्रादुर्भाव आणि अवकाळी पाऊस याचा काजू उत्पादनावर परिणाम झाला आहे. याच्यातून, काजूचे उत्पादनामध्ये गेल्या काही वर्षामध्ये सुमारे पन्नास टक्क्यांनी घट झाल्याची माहिती शेतकऱ्यांकडून सांगितली जाते आहे. उत्पादन घटले असले तरी, काजू उत्पादनासाठी कराव्या लागणाऱ्या खर्चामध्ये वाढ होवू लागली आहे. किडीचा प्रादुर्भाव आणि वाढत्या तापमानाचा परिणाम होवून होणारे नुकसान रोखण्यासाठी फवारणीसह अन्य उपाययोजना सातत्याने कराव्या लागत आहे. आधीच मनुष्यबळ कमी, त्यामध्ये मजूरीचे वाढलेले दर आणि त्यामध्ये आता फवारणी, खतांची मात्रा यांवर होणारा खर्च असा एकंदरीत, खर्चाच्या तुलनेमध्ये उत्पन्न कमी मिळत असल्याने काजू बागायतीही खर्चिक ठरत आहे.
काजू पिक संरक्षणाच्या उपाययोजना खर्चिक
तापमानवाढीने काजूचे होणारे नुकसान रोखण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. त्यामध्ये झाडांना पाणी देण्याचा सल्ला कृषी विभागाकडून दिला जात आहे. मात्र, वरकस जागा वा डोंगराळ भागामध्ये काजूची लागवड केलेली असून त्या ठिकाणी पाण्याची फारशी सुविधा उपलब्ध नाही. त्यामध्ये लागवड केलेल्या हजारो झाडांना पाणी द्यायचे कसे आणि कुठून? असा सवाल शेतकरी नामदेव घाणेकर यांनी उपस्थित केला. दुसऱ्या बाजूला मजूरांच्या सहाय्याने दूरवर उपलब्ध असलेल्या जलस्त्रोताच्या येथून पाणी आणून झाडांना देणे शक्य आहे. मात्र, त्या खर्चाचा जादा भारही वाढणार आहे. हा वाढणारा खर्च भागवायचा कसा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर ठाकला आहे.
दरातील अस्थिरता मारक
काजूचे दर हे आयात काजूच्या दरासह देशातील एकूण काजू उत्पादनावर अवलंबून असतो. नैसर्गिक प्रतिकूलतेमुळे आधीच काजूचे उत्पादन घटले आहे. त्यामध्ये परदेशातून भारतामध्ये मोठ्याप्रमाणात काजूबी आयात होत असते. भारतामध्ये प्रतिकूल हवामान आणि किडरोगांमुळे काजूचे उत्पादन घटले असले तरी, टांझानिया, घाना आदी आफ्रिकन देशामध्ये जंगली काजूचे उत्पादन वाढले असून त्यांचा दरही तुलनात्मकदृष्ट्या कमी आहे. गतवर्षी आयात (इपोर्टेड) काजुचा दर सरासरी ८० रूपये किलो होता. त्याचाही काजूबीच्या दरावर प्रतिकूल परिणाम होवून काजूबीचे दर अस्थिर राहतात. त्याचा फटका शेतकऱ्यांच्या उत्पन्न अन् आर्थिक उलाढालीवर होताना दिसत आहे.
परदेशी काजू आयातीचा प्रतिकूल परीणाम
विविध प्रक्रीया उद्योगांसाठी काजूगरांना मोठ्याप्रमाणात मागणी असते. काजूवरील तुलनात्मकदृष्ट्या कमी असलेले आयात कर आणि अन्य करांमुळे परदेशातून आयात करण्यात येणाऱ्या काजूचा दर देशातील काजूच्या तुलनेमध्ये कमी असतो. त्यामुळे नफ्याचे गणित डोळ्यासमोर ठेवून प्रक्रीया उद्योग करणाऱ्या कंपन्यांकडून सिंगापूर, आफ्रीका, ब्राझील, व्हिएतनाम आदी देशांमधून मोठ्याप्रमाणात काजू बी भारतामध्ये आयात केली जाते. याचा प्रतिकूल परिणाम देशी काजू बीच्या खरेदी दरावर होताना दिसत आहे.
प्रक्रीया उद्योगविना लाखो टन बोंडे मातीमोल
गेल्या काही वर्षामध्ये काजू लागवडीखालील आणि काजू उत्पादीत क्षेत्रामध्ये वाढ होत आहे. त्यातून, मोठ्याप्रमाणात काजू बोंडांची निर्मिती होत आहे. मात्र, काजू बोंडावर प्रक्रीया उद्योग नसल्याने दरवर्षी हंगामामध्ये निर्माण होणारे लाखो टन काजूबोंड हे मातीमोल होत आहे. काजू बोंडावर प्रक्रीया करून विविध उत्पादनांची निर्मिती झाली असती तर, त्याच्यातून रोजगार निर्मिती आणि शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धीही साधता आली असती. त्याचवेळी कराच्या स्वरूपामध्ये शासनाच्या महसूलातही वाढ झाली असती. मात्र, त्यादृष्टीने सकारात्मक निर्णय वा विचार होताना दिसत नाही. मात्र, भविष्यात काजू बोंडावर प्रक्रीया उद्योग उभारणीवर शासनाने भर द्यावा अशी शेतकऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याचवेळी बोंडापासून सरबत, सिरप तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
काजूबाबत सेंद्रीय धोरणाची गरज
हापूस आंब्या पाठोपाठ शेतकऱ्यांना काजूपासून लक्षवेधी उत्पन्न मिळते. मात्र, आंब्याचे जादा उत्पादन मिळविण्यासह आंबा टिकविण्यासाठी शेतकऱ्यांकडून आंब्यावर विविध फवारणी केली जाते. उत्पादनवाढीसाठी विविध खतांच्या मात्रा दिल्या जातात. यातून, अनेक बागांमधील आंबा केमिकलयुक्त असतो. त्या तुलनेमध्ये शेतकरी काजूवर उत्पादन वाढ आणि काजू टिकविण्यासाठी फारशी फवारणी करत नाही. जे शेतकरी फवारणी करतात त्यांचे प्रमाण हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहे. अशा स्थितीमध्ये कोकणातील काजूबाबत शासनाने सेंद्रीय धोरण निश्चित करून रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणारा काजू सेंद्रिय काजू म्हणून घोषित केल्यास त्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून मोठ्याप्रमाणात मागणी येईलच. साहजिकच, त्याचा फायदा शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नवाढीच्यादृष्टीने होणार आहे.
स्थानिक उत्पादनाचे ब्रॅन्डींग आवश्यक
रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्याप्रमाणात काजू उत्पादन होते. मात्र, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुका वगळता संपूर्ण सिधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उत्पादित होणाऱ्या अन्य काजूला अद्यापही जीआय मानांकन मिळालेले नाही. मात्र, वेगुर्ला येथील काजूला मिळालेल्या जीआय मानांकनाप्रमाणे अन्य भागातील काजूला जीआय मानांकन मिळाल्यास त्याचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रॅन्डींग होण्यास मदत होईल. जेणेकरून रत्नागिरी-सिंधुदूर्ग जिल्ह्यातील काजूला बाजारपेठेमध्ये चांगला दर मिळून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल.
संकलन , साठा करणाऱ्या यंत्रणेची गरज
काजूगरांना आणि त्यावर प्रक्रीया करून तयार केलेल्या विविध उत्पादनांना वर्षभर मागणी असते. स्थानिक पातळीवर उत्पादीत होणारा काजू प्रक्रीया उद्योगांना जून-जुलैपर्यंत उपलब्ध होतो. त्यानंतर, लागणारा काजू परदेशातून आयात झालेला प्रक्रीया उद्योगांना वापरावा लागतो. स्थानिक उत्पादित होणारा काजू वर्षभर संकलीत करून ठेवणे वा टिकवून ठेवण्यासाठी कोणतीही शासकीय यंत्रणा वा गोदाम नाही. शेतकरी वा काजू प्रक्रीया उद्योजकांना खाजगीरीत्या अशी यंत्रणा उभारणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. त्यामुळे स्थानिक स्तरावर गोदामासारखी साठवण यंत्रणा उभारल्यास स्थानिक पातळीवर उत्पादीत होणारा काजू वर्षभर उपलब्ध होईल. त्याद्वारे शेतकऱ्यांसह काजू प्रक्रीया उद्योगांनाही त्याचा आर्थिकदृष्ट्या फायदा होणार आहे.
चौकट
दृष्टीक्षेपात रत्नागिरी जिल्हा
* काजूचे एकूण क्षेत्रः १ लाख १० हजार हेक्टर
* काजूचे उत्पादनः हेक्टर ३ टन
* सरासरी उलाढालः १५० कोटी
* सरासरी काजू बोंडाची निर्मितीः ६० टक्के
- दृष्टीक्षेपात महाराष्ट्र
* महाराष्ट्र राज्य काजू पिकाखालील क्षेत्रः सुमारे १९१ लाख हेक्टर
* महाराष्ट्रातील काजू उत्पादनः सुमारे १.८१ लाख मेट्रीक टन
* महाराष्ट्राची काजू उत्पादकताः ९८२ किलो परहेक्टर
* महाराष्ट्रातील काजू पीक असलेले प्रमुख जिल्हेः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, पालघर
* काजूला जीआय मानांकन मिळालेला भागः वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग)
- दृष्टीक्षेपात काजू दर
* सध्या काजू बी दरः लहान काजू बीः ६० ते ७० रूपये
* मोठी काजू बी सरासरी १६५-१७० रूपये
- प्रतिकूल वातावरणाचा काजूला असा फटका
* मोहोर आणि फळधारणेचे प्रमाण घटले
* काजू बीची साईज घटली, सोबत पोचटपणा वाढला
* टी मॉस्किटो, करपा,फळ पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव
* कडक उन्हामुळे मोहोर काळवंडला, मोहोराला गळती
* उत्पादनामध्ये घट होवून सरासरी ४०-४५ टक्के उत्पादन
..........
- प्रक्रीया उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्या
* पुरेशा मजूरांचा अभाव
* काजू बी साठवण यंत्रणेचा अभाव
* काजू बीची साईज घटली, पोचटपणा वाढला
* दर्जेदार प्रक्रीया काजूगराला ७००-७५० रूपये
..................
- काजूच्या संकटाची ही आहेत कारणे
* प्रतिकूल हवामान, व्यवस्थापन खर्चात वाढ
* खते, फवारणीच्या दरात वाढ
* काजू बी चे दर जैसे थे
* मनुष्यबळाचा अभाव
* कमी आयात करामुळे परदेशी काजूचा दर कमी
* स्थानिक काजूपेक्षा परदेशी काजूला अधिक मागणी
* कंपन्या, घाऊक व्यापाऱ्यांकडून कमी दराने खरेदी
* हमीभावाचा अभाव
...................
- काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या...
* काजूचा हमीभाव निश्चित करा
* आयात परदेशी काजूवर करवाढ करावी
* कोकणातील काजूला जीआय मानांकन मिळावे
* घाऊक व्यापारी, कंपन्यांच्या मनमानीला चाप
* काजू बोंडावरील प्रक्रीया उद्योगांना चालना मिळावी
* काजू उद्योगासाठी मशीनरी निर्मितीवर संशोधन व्हावे
* उत्तम रोगप्रतिकारशक्तीच्या जाती तयार कराव्यात
* औषध आणि खतांवरील जीएसटी दर कमी करावा
* गोदामासारखी साठवणूक यंत्रणा उभारावी
rat९p१२.jpg
50093
डॉ. शैलेश शिंदेदेसाई
कोट १
गेल्या पाच वर्षामध्ये सरासरी ३७ ते ३९ अंश राहणारे तापमान काजू पिकासाठी प्रतिकूल आहे. त्यासोबत काजू पिकावर रोग-किडींचाही प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे काजूबीचा आकार-वजन कमी होणे, काजू बी पोचट होणे यांसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे हंगामामध्ये काजू पिकाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी सजग राहणे गरजेचे आहे. त्याचवेळी नव्या-नव्या किडरोगांच्या प्रादुर्भावासह अन्य समस्यांवर उपाययोजनासाठी अभ्यास अन् संशोधन होणे गरजेचे आहे.
- डॉ. शैलेश शिंदेदेसाई, काजू तज्ञ
- rat९p१४.jpg- विजय खांडेकर
50105
कोट २
फळधारणा न झाल्याने आधीच उत्पन्न निम्यावर आले आहे. त्यामध्ये मजूरी, खते, कीड व रोग नाशके यांच्या दरांमध्ये झालेल्या वाढीमुळे उत्पादन खर्चामध्ये तिप्पट वाढ झाली आहे. त्या तुलनेमध्ये काजू बी खरेदीला अपेक्षित भाव मिळत नाही. त्यामुळे अन्य पिकांप्रमाणे काजूचा दरवर्षी हमीभाव निश्चित व्हावा. रोजगार निर्मिती करणार्या छोट्या काजू प्रक्रीया उद्योगांना चालना देण्याबाबत सकारात्मक विचार होवून शासनाने धोरण निश्चित करावे.
- विजय खांडेकर, शेतकरी
- rat९p१३.jpg-
50094
नामदेव घाणेकर
कोट ३
वाढत्या तापमानाने काजू झाडांना आलेला मोहोर करपून गेला आहे. कीडीच्या प्रादुर्भावानेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. यातून गेल्या दोन वर्षामध्ये काजूच्या उत्पादनामध्ये पन्नास टक्क्यांनी घट झाली आहे. त्यातून, काजू हंगामात केलेला खर्चही भागविणे मुश्किल झाले आहे. फवारणी, खते याच्यावर आकारण्यात येणारा जीएसटीचा दर कमी करताना अनुदान उपलब्ध करून शासनाने शेतकऱ्यांना साथ दिल्यास बागायतदारांना दिलासा मिळणार आहे.
- नामदेव घाणेकर,
उपाध्यक्ष, सौंदळ ग्रुप विकास सेवा सोसायटी
rat९p१७.jpg-
50108
संदेश दळवी
कोट ४
वर्षभर काजू बी उपलब्ध न होणे, मजूर आदी समस्यांच्या गर्तेमध्ये अडकलेल्या काजू प्रक्रीया उद्योगांनाही पूर्वीच्या तुलनेमध्ये प्रक्रीया काजूगरांना सध्या न मिळणाऱ्या दरामुळे आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. काजू बी तोडीबाबत शेतकऱ्यांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. त्याचवेळी, स्थानिकपातळीवर उत्पादित होणारी काजू बी वर्षभर प्रक्रीया उद्योगांना उपलब्ध होईल अशी या बीची साठवणूक होण्यासाठी यंत्रणा उभारणे गरजेचे आहे.
- संदेश दळवी, काजू प्रक्रीया उद्योजक
-----
rat९p१८.jpg-
50095
गजानन पाटील
कोट ५
बाजार समितीद्वारे शेतकऱ्यांसाठी काजू बी तारण कर्ज योजनेचा दरवर्षी लाभ दिला जातो. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात काजू बी चा दर कमी होतो. या कालावधीत काजू शेतकऱ्यांची बी घेते. त्यावर ६ टक्के व्याजाने कर्ज देते. हे कर्ज देताना काजू बीचा किलोचा दर हा बाजारभावाच्या ७० टक्के इतका आकारला जातो. तारण घेतलेली काजू बी हंगाम संपल्यानंतर चार ते पाच महिन्यांनी विक्रीला काढली जाते. त्यावेळी चांगला दर मिळतो.
- गजानन पाटील, संचालक, बाजार समिती