वाकड : वेस्टर्न अव्हेन्यू ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सर्व सदस्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर झाले. महिला सदस्यांनी स्वरचित स्वागतगीत आणि महिलांच्या सन्मानार्थ पोवाडा गायला. शहर भाजपचे उपाध्यक्ष राम वाकडकर, श्रृती वाकडकर, ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषाली मरळ यांचा सत्कार झाला. मार्च महिन्यात वाढदिवस असलेल्या सदस्य तसेच ७५ वर्षांवरील महिलांचा विशेष सत्कार संघाचे समन्वयक आनंद तायडे यांनी केला. संघातील महिला व पुरुष डॉक्टरांचा सत्कार मिलिंद बनगीनवार यांनी केला. देणगीदारांचा सत्कार कोषाध्यक्ष गंजेवार यांनी केला. एमआयटीच्या प्राचार्या रोहिणी पटवर्धन यांनी ‘समृद्ध जीवनाची संकल्पना’ विषयावर व्याख्यान दिले. उपाध्यक्षा स्नेहल घोसाळकर यांनी प्रास्ताविक केले. खंडेराव कुलकर्णी यांनी सन्मान, शोभा वाडेकर यांनी सूत्रसंचालन तर अध्यक्ष पुरुषोत्तम गोडबोले यांनी आभार मानले.